Share

तासगाव तालुक्यात निवडणूक शांततेत तर मांजर्डे गावात राष्ट्रवादीने गुलाल जेसीबीने उधळला

Published On: 

🕒 1 min read

राजू थोरात, तासगाव : तासगाव तालुक्यात 39 ग्रामपंचायत निवडनुक अत्यंत काटयाची झाली होती.त्यामध्ये 3 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या होत्या. 36 निवडणूकीसाठी निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक शांततेत पार पडली.

तर पोलीस उपअधीक्षका अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक राजेंद्र सावंत्रे,सहायक पोलिस निरीक्षक पंकज पवार नितीन केराम व पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप सालोखे, विश्राम मदने, विठ्ठल शेळके, सांगली विशेष शाखेचे पोलीस हवालदार आप्पा साबळे यांच्यासह सांगली पोलीस मुख्यालय व तासगाव पोलिसांच्या अथक परिश्रमामुळे निवडणूक शांततेत पार पडली. राष्ट्रवादीचे आमदार सुमनताई पाटील व सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांचे होम पिच तासगाव तालुका आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष तासगाव तालुकयावर होते.

राष्ट्रवादी व भाजपने मांजर्डे गाव हे केंद्रबिंदू केले होते. मांजर्डे येथील राष्ट्रवादीचे नेते दिनकर पाटील यांचे 6 महिन्यापूर्वी निधन झाले होते. माजर्डे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहन पाटील यांनी पॅनल उभं केले होतं. तेथे राष्ट्रवादीने बाजी मारत 15 जागा जिंकून विजयी गुलाल स्वर्गीय दिनकर दादा पाटील यांना समर्पित केला आहे. माजंर्डेत भाजपला एकही जागा मिळाली नाही.

मांजर्डे गावामध्ये विजयी मिरवणूक जेसीबीच्या साह्याने गुलाल उधळत काढली आहे. तर तासगावात खासदार संजयकाका पाटील यांच्या कार्यालयात जल्लोष साजरा केला ग्रामपंचायत मध्ये तुरची बोरगांव कवठेएकंद, हातनोली, धूळगाव, हातनूर, पेड या गावासह अनेक गावांत भाजपने एक हाती सत्ता घेतल्याने खासदार संजय काका पाटील यांच्या कार्यालयामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांचे होमपिच तासगाव तालुका होते. संजय काका पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी गनिमीकाव्याने निवडणूक लढवली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!