हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील दिग्रसवाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीप्रणित पॅनेलमधील ९ उमेदवारांपैकी ८ जागांवर यश मिळाले आहे. या पॅनेलमध्ये वंचित बहुजन आघाडीने परदेशातून राज्यशास्त्रात डॉक्टरेट मिळविलेल्या डॉ. चित्रा कुऱ्हे यांना निवडणुकीच्या रिंगणात उभे केले होते. ग्रामस्थांनी प्रस्थापित उमेदवारांना बाजूला सारून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या गळ्याच विजयाची माळ घातली आहे.
डॉ. चित्रा कुऱ्हे आणि त्यांचे पती डॉ. अनिल कुऱ्हे ८ वर्षे विदेशात राहिलेले आहेत. विजयी उमेदवार डॉ. चित्रा कुऱ्हे यांनी ५ भाषांचे ज्ञान आहे. भारतात परतल्यानंतर कुऱ्हे दाम्पत्याने दिग्रसवाणी गावात सामाजित कार्यात पुढाकार घेतला. तसेच वंचित बहुजन आघाडीमार्फत त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
दिग्रसवाणी निवडणुकीच्या प्रचारात डॉ. चित्रा कुऱ्हे यांनी सरपंचपदाच्या उमेदवार म्हणूनच प्रचार केला. गावच्या मतदारांनी उच्चशिक्षित डॉ. चित्रा कुऱ्हे यांच्यासहीत पॅनेलमधील ९ उमेदवारांपैकी ८ उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ घातली. कुऱ्हे यांच्या पॅनेलमध्ये महिला उमेदवारांची संख्या जास्त आहे. डॉ. चित्रा कुऱ्हे यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे कौतूक होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- नेत्यांनी पहिल्यांदा आपली गल्ली सांभाळायला पाहिजे नंतर महाराष्ट्र; मुश्रीफांचा पाटलांना टोला
- असमानतेचा सामना करून अखेर तृतीयपंथी अंजली पाटील यांनी संघर्षाचा शेवट गोड केला !
- ‘कोकणात भगवा फडकला…पण तो भाजपाचा!’
- बहिष्कार, भाऊबंदकी आणि धुरळा; अकलूजची चर्चाच चर्चा
- निकाल लागले, आता सरपंचपदाची आरक्षण सोडत कधी? हसन मुश्रीफ म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

