Share

‘पोरं एका दिवसात होत नाहीत, ९ महिने लागतात; काम करत असताना त्रास तर होणारचं’

Published On: 

🕒 1 min read

सातारा :  भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हे कायमच आपल्या स्टाईल आणि डायलॉगबाजीने चर्चेत असतात. साताऱ्यातील राजकारणात आपलं स्थान निर्माण करण्यासह छत्रपतींचे वंशज असल्याने त्यांचे राज्यभरात मोठ्या प्रमाणात समर्थक आहेत.

काही दिवसांपूर्वी उदयनराजेंनी सातारकरांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेल्या पोवई नाका येथील ग्रेडसेप्रेटरचे उद्घाटन केले होते. पोवई नाका भागात होणारी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी ग्रेडसेप्रेटर बांधण्यात आला आहे. गेल्या पावणेतीन वर्षांपासून याचं काम सुरु होतं. ग्रेडसेप्रेटरचं काम पूर्ण झालं आहे. मात्र, मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करावयाचे असल्याने याचे उद्घाटन रखडले होते. यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता.

हे उदयनराजेंना समजताच त्यांनी पाहणीचे नियोजन करण्याचे आदेश सातारा विकास आघाडीच्या नेत्यांना दिले. त्यानुसार ते आपल्या कार्यकर्त्यांसह दाखल झाले. याचवेळी त्यांनी अचानक उद्घाटन उरकून घेऊन याचे लोकार्पण देखील केले होते. ग्रेड सेपरेटचे उद्घाटन केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताऱ्यात बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली होती.

दरम्यान, उदयनराजे भोसले हे आज साताऱ्यात मेडिकल कॉलेजच्या प्रश्नाबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी त्यांना ग्रेड सेपरेटचे उद्घाटन पुन्हा करण्यात येणार यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केलेल्या विधानाची चर्चा सद्या रंगली आहे. ‘काम करत असताना त्रास तर होणारचं. पोरं एका दिवसात होत नाहीत, ९ महिने लागतात. त्रास झाल्याशिवाय मुले तर होत नाहीत हे तर ग्रेड सेपरेटर आहे,’ असं उदयनराजे म्हणाले. यासंदर्भात पुढारीने वृत्त दिलं आहे.

तर, ‘शरद पवारांना विनंती करून देखील कोणतेही लोकप्रतिनिधी ग्रेड सेपरेटरच्या भूमिपूजनावेळी आपल्या संकुचित विचार आणि नाकर्त्यापणामुळे आले नाही म्हणून उद्घाटन उरकले,’ असं देखील त्यांनी ठणकावून सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!