संगमनेर : राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या होत्या. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. आज निवडणूक पार पडलेल्या ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर होत असून जवळ-जवळ सर्वच ग्रामपंचायतींचे निकाल हे जाहीर झाले आहेत.
यंदा भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची सत्ता राज्यात स्थापन केली. ग्रामपंचायतमध्ये पक्षांचं निवडणूक चिन्ह वापरलं जात नसलं तरी पुरस्कृत पॅनेल्समध्ये निवडणूक होते.ग्रामपंचायती निकालांमध्ये एकूण महाराष्ट्रातील स्थिती बघितली तर शिवसेना आणि भाजपमध्ये मोठी चुरस रंगल्याच दिसून येत आहे.
महाविकास आघाडीला एकत्रितपणे मोठ्या प्रमाणात यश मिळालं असून तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी या निकालांचे स्वागत केलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील या निकालांवर भाष्य केलं आहे. निकालांचे हे एकत्रित महाविकास आघाडीचं यश आहे. महाविकास आघाडीला ८० टक्के जागा राज्यात मिळाल्या आहेत. चार ते साडे चार हजार गावात सरपंच हे काँग्रेसचे झालेले दिसतील. या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे की भाजपच्या आजी आणि माजी प्रदेशाध्यक्ष यांना त्यांची गावं सुद्धा सांभळता आली नाहीत हे आहे.’ असा टोला देखील बाळासाहेब थोरात यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘…त्यानंतर शिवसेनेला अक्कल यायला हवी होती, मात्र आतातरी त्यांनी आपली इज्जत आपणच राखावी’
- असमानतेचा सामना करून अखेर तृतीयपंथी अंजली पाटील यांनी संघर्षाचा शेवट गोड केला !
- ‘कोकणात भगवा फडकला…पण तो भाजपाचा!’
- बहिष्कार, भाऊबंदकी आणि धुरळा; अकलूजची चर्चाच चर्चा
- ग्रामपंचायत निवडणूक निकाल : जिंतूर तालुक्यात भाजपचा, तर सेलूत राष्ट्रवादीचा वर्चस्वाचा दावा

