Share

सांगली महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची कामे पूर्ण न केल्यास ‘चक्का जाम’-शिवसेना

Published On: 

सांगली: सांगली महापालिका क्षेत्रात राज्य शासन निधीतून मंजूर ३३ कोटी रूपयांची १४७ रस्त्यांची कामे तातडीने सुरू करावीत. अन्यथा, ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे युवा नेते सांगली महापालिकेतील नगरसेवक शेखर माने यांनी आज दिला.शेखर माने यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेतील उपमहापौर गटाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एस. जाधव यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. या रस्त्यांची ही सर्व कामे येत्या दहा दिवसात तातडीने सुरू करण्याची ग्वाही डी. एस. जाधव यांनी दिली.

 महापालिका क्षेत्रातील सांगली व कुपवाड शहरासह विस्तारीत भागात ३३ कोटी रूपये खर्चाची १४७ रस्त्यांची कामे राज्य शासन निधीतून मंजूर झाली आहेत. या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने दीड वर्षापूर्वी महापालिका प्रशासनाकडून ना हरकत दाखले आहेत. त्यानंतर या कामासाठी निधी वर्ग होऊन निविदा प्रक्रियाही झाली. या रस्ते कामाचे कार्यआरंभ पत्रही एक महिन्यापूर्वी संबंधित ठेकेदारांना देण्यात आलेले आहे. मात्र अद्यापही या रस्ते कामाला मुहूर्त सापडलेला नाही. वास्तविक, या रस्ते कामातील सुमारे साडे चार कोटी रूपयांची बेकायदेशीर भाववाढ नुकतीच आपण हाणून पाडलेली आहे. सध्या या रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. परिणामी वाहनधारकांना वाढत्या अपघात व नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. रखडलेल्या या रस्ते कामामुळे सांगलीकरांतून तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे मंजूर झालेली रस्त्यांची ही कामे तातडीने सुरू करावीत व हे सर्व रस्ते गुणवत्ता पध्दतीने करण्यात यावेत. अन्यथा, समस्त सांगलीकरांच्यावतीने ‘चक्का जाम’ करून जनआंदोलन उभारावे लागेल, असा इशाराही शेखर माने यांनी दिला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!