Share

पुणे विभागातील तब्बल 52 हजार 200 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन गेले घरी

Published On: 

पुणे  :- पुणे विभागातील 52 हजार 200 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 88 हजार 152 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 33 हजार 546 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 406 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 935 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.२७ जुलै पर्यंत पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 59.22 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.73 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे जिल्हयातील 71 हजार 500 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 44 हजार 243 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 25 हजार 552 आहे.
पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 705 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 192, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 301 व पुणे कॅन्टोंन्मेंट 31, खडकी विभागातील 33, ग्रामीण क्षेत्रातील 99, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 49 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 665 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.88 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.38 टक्के इतके आहे.

कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार 697 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 814, सातारा जिल्ह्यात 105, सोलापूर जिल्ह्यात 316, सांगली जिल्ह्या 80 तर कोल्हापूर जिल्ह्यात 382 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 3 हजार 203 रुग्ण असून 1 हजार 743 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 351 आहे. कोरोनाबाधित एकूण 109 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हयातील 7 हजार 383 कोरोना बाधीत रुग्ण असून 4 हजार 118 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 831 आहे. कोरोना बाधित एकूण 434 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 1 हजार 573 रुग्ण असून 462 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 63 आहे. कोरोना बाधित एकूण 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हयातील 4 हजार 493 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 634 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 749 आहे. कोरोना बाधित एकूण 110 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 4 लाख 37 हजार 33 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 4 लाख 33 हजार 114 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 3 हजार 919 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 3 लाख 44 हजार 130 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘सरकारने खुशाल लॉकडाऊन लावावा, आम्ही नागरिकांना लॉकडाऊन मोडायचं आवाहन करू’

खरीप हंगामाकरीता प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी 31 जुलै पर्यंत सहभागी होण्याचे आवाहन

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!