औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील पिशोर येथे शुक्रवारी पहाटे विजेसह अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले, त्यामुळे रब्बी हंगामातील पिक वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तर पिशोर शिवारातील जाधव यांच्या शेतात असलेल्या बैलावर वीज पडल्यामुळे बैल ठार झाल्याची पहाटे घडली आहे.
शुक्रवार रोजी पहाटे अचानक वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडटासह पाऊसास सुरुवात झाली. रब्बी हंगामात अचानक अवकाळी पाऊस आल्याने हाता तोंडाशी आलेले गहू कांदा, हरभरा, या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे तर खळ्यावर काढून ठेवलेल्या गहू भिजल्याने हातात आलेल्या पिकांचे ही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. यादरम्यान पिशोर शिवारातील मोहंद्री भागातील गट नं १७३ मधील कैलास सर्जेराव जाधव या शेतकऱ्याच्या गोठयातील बांधलेल्या बैलावर वीज कोसळल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाला.
तर विजेच्या आवाजाने इतर जनावरे दावे तोडून बाजूला सैरावैरा पळाले मात्र यात एका बैलाचा वीज पडून दुर्दवी मृत्यू झाला असल्याने महसूल विभागाच्या तलाठी दीपाली बागुल कोतवाल हरून शेख यांनी पंचनामा केला आहे सदरील घटनेत पंचावन्न हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे..तर डॉ चोले व सहकारी संतोष वाघ यांनी तपासणी केली. या शेतकऱ्यास लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.
महत्वाच्या बातम्या
- जबरदस्तीने वीजबिल वासून कराल तर आम्ही कायदा हातात घेवू; राजू शेट्टींचा आक्रमक इशारा
- योगीजींच्या नेतृत्वात उत्तर प्रदेश निरंतर प्रगतीपथावर राहून ‘सर्वोत्तम प्रदेश’ बनावा – नाईक
- मुंबईत आज पासूनच कडक निर्बंध लागू होऊ शकतात – महापौर किशोरी पेडणेकर
- सचिन वाझे आणि हिरेन यांचे ‘ते’ सीसीटीव्ही फुटेज आले समोर
- कर्नाटकने महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसना बंदी घातली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

