Share

नांदेडमध्ये २१२ नव्या रुग्णांची भर तर २२५ जण कोरोनामुक्त

Published On: 

नांदेड: जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या काही प्रमाणात कमी होत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे, मात्र अशातच आता म्युकरमायकोसिस या नवीन आजाराने चांगलेच डोके वर काढले आहे. एकीकडे कोरोना आणि दुसरी कडे म्युकरमायकोसिस, यात होरपळून निघतोय सामान्य माणूस. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या व त्यातून बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.

जिल्ह्यात गेल्या २४ तासात २२५ कोरोनाबाधितांना उपचाराअंती घरी पाठविण्यात आले आहे. तर २१२ जणांची नव्याने भर पडली असून गेल्या दोन दिवसात ५ जण मरण पावले आहेत. जिल्ह्यातील विविध रुग्णालयात १५२५ जणांवर उपचार चालू असून यापैकी ६१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. नांदेड जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३११५ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २८७६ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. तर २१२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले असून त्यामध्ये नांदेड मनपा क्षेत्रातील ७९ जणांचा समावेश आहे.

गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात ५ कोरोनाबाधित मरण पावले. त्यामध्ये नांदेड शहरातील तुळशीरामनगरमधील ६३ वर्षीय महिला, हडको भागातील ५२ वर्षीय पुरूष, पिरबुऱ्हाणनगरमधील ५५ वर्षीय पुरूष, मुखेड तालुक्यातील उंद्री येथील ७० वर्षीय महिला, हदगाव येथील १७ वर्षीय युवतीचा समावेश आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ५ लाख २४ हजार ६६५ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४ लाख २५ हजार ३५६ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. ८८ हजार ६२६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यापैकी ८४ हजार ७२४ जणांना उपचाराअंती घरी पाठविण्यात आले. तर १८६८ जण मरण पावले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५९ टक्के आहे. १९३ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!