जालना : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत या महिन्यात विक्रमी वाढ झाली आहे. आज सकाळी तब्बल 31 रुग्णांची वाढ झाली असून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या आता 554 वर पोहोचली आहे. जालना शहरातील रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून होत असलेली वाढ ही शहरातील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक बाब असून प्रशासनही हादरून गेले आहे.
जिल्हाधिकारी होम व्कारंटाइनमध्ये, पंढरपुरातील नियोजनाची जबाबदारी आता ‘या’ अधिकाऱ्यावर
दरम्यान, जालन्याला शेजारील औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 252 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामध्ये 151 पुरूष, 101 महिला आहेत. आतापर्यंत एकूण 5535 कोरोना बाधित आढळले असून 2669 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. 259 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता 2607 रुग्णांवर उपचार सुरु झाली आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. अनलॉक 2 अंतर्गत मोदी सरकारने अनेक निर्बंध शिथील केले असून अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. 30 जून रोजी लॉकडाऊन संपत आहे. अनलॉकचा पहिला टप्पा सध्या सुरू आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात इराणकडून अटक वॉरंट जारी
दरम्यान मोदी सरकारने लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली आहे. ‘अनलॉक’च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. अनलॉक 2 मध्ये असणारी नियमावली केंद्र सरकारने जाहीर केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

