Share

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात इराणकडून अटक वॉरंट जारी

Published On: 

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह आणखी काही जणांविरोधात इराणने अटक वॉरंट जारी केले आहे. विशेष म्हणजे ट्रम्प आणि इतर लोकांना ताब्यात घेण्यासाठी इराणने इंटरपोलची मदत मागितली आहे.

सभापतीपदीच्या शर्यतीत अनेक दिग्गज रिंगणात असताना राष्ट्रवादीने दिली सामान्य कार्यकर्त्याला संधी

अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात इराणच्या कुद्स फोर्सचा प्रमुख मेजर जनरल कासिम सुलेमानी 3 जानेवारीला ठार झाला होता. अमेरिकेने इराकची राजधानी बगदादमध्ये हा हल्ला केला होता. या हल्ल्याला अध्यक्ष ट्रम्प आणि इतर 30 अधिकारी जबाबदार असून त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला भरावा अशी मागणी इराणने इंटरपोलकडे केली आहे.

इराणने इंटरपोलकडे ट्रम्प आणि या हल्ल्यात सहभागी असलेल्या इतर लोकांच्या विरोधात ‘रेड कार्नर नोटिस’ जारी करण्याची मागणी केली आहे. इंटरोपाल अत्यंत गंभीर प्रकरणात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना रेड कॉर्नर नोटिस जारी करते. त्यानंतर स्थानिक अधिकारी इंटरपोलला त्यांच्या देशाच्या वतीने इच्छित व्यक्तीला अटक करण्यासाठी विनंती करतात.

भारत सरकारचा ‘तो’ आरोप चुकीचा, टिक टॉकने निवेदन जारी करत केला खुलासा

ही नोटीस संबंधित देशाला इच्छित व्यक्तीस अटक करण्यास किंवा प्रत्यार्पणासाठी सक्ती करू शकत नाही. मात्र, या सूचनेच्या आधारे, सरकार त्या व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवून, त्याच्या प्रवासावर बंदी घालू शकते.मात्र असे असले तरी इराणने केलेल्या या कारवाईमुळे ट्रंम्प यांच्या अटकेचा कोणताही धोका नाही. पण या आरोपांमुळे इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला असल्याचं दिसत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!