Share

राष्ट्रवादीचा गुजरातेत स्वबळाचा नारा, पुरोगामी मतांची आता विभागणी होत नाही का ?

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस ने पुरोगामी विचारांचा मुद्दा पुढे करत आघाडी केली आहे. मात्र महाराष्ट्र व्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी विभक्त लढणार आहेत. त्यामुळे पुरोगामी विचारांचा मुद्दा हा फक्त राज्यापुरताच मर्यादित आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे.

गुजरातमध्ये युती आणि आघाडी मध्ये डाळ न शिजल्याने शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा स्वतंत्र निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे गुजरात मध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष एकमेकांविरोधात लढणार आहेत. राज्यात पुरोगामी विचारांचा नारा देवून सत्ताधारी भाजप आणि युती विरोधात एकत्र आलेले कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस इतर राज्यांमध्ये हा धर्म पाळताना दिसत नाहीत. त्यामुळे या राजकीय पक्षांची राज्यनिहाय बदलणारी भूमिका सामन्य नागरिकांना पेचात टाकणारी आहे.

दरम्यान राष्ट्रवादी प्रमाणे शिवसेनेची देखील दुतोंडी भूमिका या निवडणुकीच्या निमित्ताने समोर आली आहे. बंगालमध्ये सेनेनं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महराष्ट्रात हिंदुत्ववादी मुद्यावरून भाजप आणि सेनेमध्ये युती झाली आहे. मात्र तो मुद्दा बंगालमध्ये लक्षात का घेण्यात आला नाही. असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. तसेच सेना भाजप महाराष्ट्रात वेगळे लढले तर हिंदुत्ववादी मतांची विभागणी होईल अशी भीती सेनेने व्यक्त केली होती. मग आता भाजप विरोधात बंगाल मध्ये लढताना हिंदुत्वादी मतांची विभागणी होणार नाही का असा सवाल सोशल मिडीयावर उपस्थित होऊ लागला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!