गडचिरोली : गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगला घातलेला विळखा हा वाढतच आहे. देशासह अनेक राज्यातील शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. राज्यातील अनेक शहर व जिल्हे पुन्हा लॉकडाऊनमध्ये जात आहेत. राज्यात सर्वाधिक काळ कोरोनामुक्त राहिलेल्या गडचिरोली जिल्ह्यात गेल्या महिनाभरात कोरोनारुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. आतापर्यंत २१५ जणांना कोरोनाने ग्रासले.
या २१५ जणांपैकी १०३ रुग्ण नक्षलविरोधी अभियानासाठी बाहेरून आलेल्या सुरक्षा दलांचे जवान आहेत. आज (दि.१४) राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) २९ जवानांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. गेल्या आठवड्यात १५० एसआरपीएफ जवानांची तुकडी धुळे येथून गडचिरोलीत आल्यानंतर जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या परिसरात ते सर्व जवान संस्थात्मक विलगिकरणात होते. उर्वरित जवानांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. असे वृत्त लोकमतने दिले आहे.
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) विविध बटालियनचे जवान गेल्या महिनाभरात सुट्यांवरून जिल्ह्यात परत आले आहेत. ते सर्व वेगवेगळ्या ठिकाणी संस्थात्मक विलगिकरणात होते. त्यापैकी ७२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय सीमा सुरक्षा दलाचे २ जवान पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यात दाखल झालेल्या विविध सुरक्षा दलाच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०३ झाली आहे.
आतापर्यंत थोडा दिलासा मिळतो आहे कि, जिल्ह्यातील केवळ एका रुग्णाचा हैदराबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तो हृदयरोगी होता. याशिवाय ७१ जणांनी कोरोनावर मात केली असून उर्वरित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
‘प्रभू रामचंद्र हे भारतीय नाही तर नेपाळी होते…’
कोल्हापूरकरांची चिंता वाढली; जिल्ह्यातील आणखी ८ जण पॉझिटिव्ह
पुण्यात आजपासून कडक लॉकडाऊन, सात हजार पोलिसांचा बंदोबस्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

