औरंगाबाद : शेतीसाठी वीज हा महत्वाचा घटक असल्याने यात असणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी तात्काळ ऊर्जामंत्र्यांसोबत बैठक घेणार आहे. रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये वाढ झालेली आहे. याबाबत राज्य शासन केंद्र शासनाशी चर्चा करणार असून हा प्रश्न कसा सोडविता येईल याबाबत मार्ग काढला जाईल. याबाबत शेतकऱ्यांना सबसिडी देता येईल का? असे देखील प्रयत्न केले जातील असे निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी (दि.१७) दिले. जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री म्हणाले की, जिल्ह्यात कापुस आणि मक्याचे क्षेत्र वाढत आहे. ह्या अनुषंगाने देखील विभागाने नियोजन करावे. इतर पिकांचे बियाणे तसेच खत शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात मिळण्यासाठी नियोजन करावे. मागच्या वर्षी अनेक ठिकाणी सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी पाहता सोयाबीन बियाणे उत्पादन करणाऱ्या बियाणे कंपन्यानी पुन्हा ही तक्रार येऊ देऊ नये. जिल्हाधिकारी यांनी सर्वप्रथम सादरीकरणाव्दारे जिल्ह्यातील कृषी बाबत माहिती देताना सांगितले की, जिल्ह्यामध्ये मागील ५ वर्षात खरीप हंगामाचे पिकाखालील सरासरी क्षेत्र ६७५१७१ हे. असून कापूस व मका ही दोन प्रमुख पिके आहेत.
या दोन पिकांचे सरासरी क्षेत्र अनुक्रमे ३.९४ लक्ष हेक्टर व १.७२ लक्ष हेक्टर असून चालू वर्षी खरीप हंगामात तुर, सोयाबीनचे वाढलेले दर लक्षात घेता दोन्ही पिकांच्या क्षेत्रात वाढ अपेक्षित आहे. खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये ६.८१ लक्ष हेक्टरवर पेरणी अपेक्षित असून कापूस पिकाखाली ३.९९ लक्ष हे., मका पिकाखाली १.५५ लक्ष हे. तुर पिकाखाली ०.४२ लक्ष हे. व सोयाबीन पिकाखाली ०.२० लक्ष हे. पेरणी अपेक्षित आहे.
या नियोजनाप्रमाणे बियाणे पुरवठा होण्यास सुरुवात झालेली आहे. खरीप हंगाम २०२१ साठी लागणारी बियाणे, खते यांचे नियोजन करण्यात आले असुन पुरवठा नियोजनाप्रमाणे जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरु झालेला आहे. खरीप हंगाम २०२१ साठी प्रस्तावित केलेल्या क्षेत्रासाठी केंद्र शासनाकडे मागणी केल्याप्रमाणे युरिया , एमोपी संयुक्त खते आणि एसएसपी असे एकुण २५५८१० मे.टन आवंटन मंजुर केलेले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आणखी दोन दिवस समुद्र खवळलेला राहणार; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन
- विनाकारण फिरणाऱ्या ९८ नागरिकांची कोरोना तपासणी, २ पॉझिटिव्ह!
- ‘याचा कचरा करायला शब्दच नाहीत; थर्माकोलची तलवार घेऊन मिटकरी आकाशाला खुन्नस देतोय !’
- कोरोनावर उपायकारक ‘2-डीजी’ या भारतीय औषधाचे राजनाथ सिंह यांनी केले लोकार्पण
- तोक्ते चक्रीवादळानंतर रत्नागिरी जिल्ह्यात पंचनाम्याचे काम सुरू…


