🕒 1 min read
कोलकत्ता : भारताच्या पूर्व किनारपट्टीवर यास चक्रीवादळ येऊन धडकलं आहे. यासमुळे 6 राज्यात पश्चिम बंगाल, ओडिशा, तमिळनाडू, झारखंड आणि कर्नाटकमध्ये जोरदार पाऊस येणार असल्याचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. ओडिशा पश्चिम बंगालसह तमिळनाडू कर्नाटकमध्ये मंगळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. किनारपट्टी भागात या वादळाचा मोठा धोका पाहायला मिळतो आहे.
यास चक्रीवादळामुळं पश्चिम बंगालमध्ये किनारपट्टीच्या परिसरात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून त्यामध्ये लोकांच्या कार बुडताना दिसत आहेत. सध्या किनारपट्टीच्या भागात जवळपास 180 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. दक्षिण 24 परगण्यातही लोकांच्या मदतीसाठी आणलेला एक जेसीबी पाण्यात बुडाल्याची घटना समोर आली. ओडिशामध्ये देखील मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून झारखंडमध्ये वादळ उद्या पोहोचेल असा अंदाज आहे.
#WATCH | Odisha: Strong winds and heavy rain hit Dhamra in Bhadrak district as #CycloneYaas nears landfall.
IMD says that the 'very severe cyclonic storm' is expected to make landfall by noon today with wind speed of 130-140 kmph gusting up to 155 kmph. pic.twitter.com/fveRV5Xfqb
— ANI (@ANI) May 26, 2021
परंतु आता ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या अनेक किनारपट्टी भागात जोरदार पाऊस आणि वारा सुरू आहे. या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता पश्चिम बंगाल आणि ओडिसाच्या किनारपट्टी भागातून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर पावसामुळे प्रचंड पाणी साचले आहे. यामुळे अनेक घरांवरचे छप्पर उडून गेलेत. या वादळामुळे सध्या १ कोटी जनतेचे जनजीवन विस्कळीत झाले असल्याची माहिती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्यात जर कुठे भुताटकी असेल तर ती ‘मातोश्री’वरच; राणेंचे राऊतांना प्रत्युत्तर
- ‘हेमा मालिनी एक महान कलाकार आहे’; सावत्र नातवाने केले कौतुक
- होम आयसोलेशनवर बंदी घालण्याचा निर्णय अव्यवहार्य; पुण्याच्या महापौरांनी व्यक्त केली नाराजी
- ग्रामीण भागातील कोरोनाविरुद्धच्या लढ्याला मिळणार बळ,राज्य सरकारने केला ‘हा’ आदेश जारी
- ‘बाप लेकीची मिठी जी चिरंतन राहील’; विलासरावाच्या जयंतीनिमित्त जेनेलियाची भावुक पोस्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
