Share

भूमिपूजन सोहळ्याआधीच मुख्य पुजाऱ्याबरोबच १६ सुरक्षा रक्षकांना करोनाची लागण

Published On: 

नवी दिल्ली- जगभरातील हिंदूंचे श्रद्धास्थान असणाऱ्या आयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर बनविण्यात येणार आहे. या अयोध्येतील राम मंदिराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. यासाठी जवळपास ३०० जणांना आमंत्रित करण्यात येणार असल्याचं राम जन्मभूमि ट्रस्टकडून सांगण्यात आलं आहे.

सकाळी ११.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल होणार आहेत. त्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी राम जन्मभूमीवर उपस्थित होणार आहेत. इथे ते नागरिकांनाही संबोधित करणार आहेत. अयोध्येत पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी साकेत विद्यापीठातून रामजन्मभूमीकडे रवाना होतील. यावेळी पंतप्रधान मोदी हनुमानगढीलाही भेट देतील. भूमिपूजन कार्यक्रमात जवळपास २०० पाहुणे सहभागी होतील, असं सांगण्यात येतंय.

दरम्यान, एका बाजूला या सोहळ्याची जोरदार तयारी सुरु असताना मुख्य पुजाऱ्याबरोबच १६ सुरक्षा रक्षकांना करोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रामजन्मभूमीच्या जागेची पूजा करणारे पुजारी प्रदीप दास यांच्या करोना चाचणीचे निकाल पॉझिटीव्ह आले आहेत.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार,आचार्य सत्यंद्र दास यांचे शिष्य असणारे प्रदीप हे रामजन्मभूमीच्या प्रमुख चार पुजाऱ्यांपैकी एक आहेत. दास यांच्या करोना चाचणीचे निकाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. याच प्रार्थनास्थळाच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या १६ पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

10 ऑगस्टपर्यंत कोरोनाची लस बाजारात आणणार, रशियाचा मोठा दावा

महाकाय कोविड सेंटरसाठी लवासा ताब्यात घ्या; गिरीश बापटांचा सल्ला

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!