Share

महाकाय कोविड सेंटरसाठी लवासा ताब्यात घ्या; गिरीश बापटांचा सल्ला

Published On: 

पुणे : गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगला घातलेला विळखा हा वाढतच आहे. देशासह अनेक राज्यातील शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. पुण्यातही करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुण्यात बुधवारी नव्याने १ हजार ३०८ नव्या कोरोना बधितांची वाढ झाली आहे. आजपर्यंत शहरात एकूण ५१ हजार ७३८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते खासदार गिरीश बापट यांनी लवासामधील जागा कोविड केअर सेंटरसाठी ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.

गिरीश बापट यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र पाठवलं असून कोविड केअर सेंटरसाठी लवासाच्या जागेचा वापर करण्याचंही सूचवलं आहे. त्यांनी लवासाकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मुळशी तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्याही वाढत असून तालुक्यातील लोकांसाठीच बेड उपलब्ध नसल्यानं त्यांना समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून ही मागणी करण्यात आली. असे वृत्त लोकसताने दिले आहे.

“लवासामध्ये अनेक इमारतींसोबतच सुविधांनी परिपूर्ण असं एक रुग्णालयदेखील आहे. फारच कमी लोकं त्या ठिकाणी राहत आहे. कोरोनाबाधितांना क्वारंटाइन करण्यासाठी ती जागा चांगली ठरू शकते. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे. तसंच ज्या प्रमाणे त्या ठिकाणी रुग्णालय उपलब्ध आहे त्यामुळे पायाभूत सुविधांवर कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही. रुग्णांसाठी बेड्स आणि करोनाशी लढण्यासाठी आवश्यक त्या सुविधा आपण या ठिकाणी निर्माण करू शकतो,” मुळशीतील करोनाबाधित रुग्णांवर त्या ठिकाणी उपचार केले जाऊ शकतात,” असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

सध्या जिल्हा प्रशासनाकडून करोनाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त बेड्स तयार करण्यासाठी शाळा, खासगी रुग्णालये आणि हॉटेल्स ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे. परंतु लवासा याजागेचा प्रशासनाकडून आढावा घेण्यात येत असल्याने स्थानिक नागरिकांकडून या प्रस्तावाचा निषेध करण्यात येत असल्याचंही त्यांनी कबूल केलं. “त्याचं कोविड केअर सेंटरमध्ये रूपांतर झाल्यास आपल्याला करोना विषाणूची बाधा होईल आणि शहरात त्याचा प्रसार होईल अशी भीती नागरिकांच्या मनात आहे. परंतु आम्ही रिक्त असलेल्या मोठ्या जागांबाबत बोलत आहोत. त्यामुळे करोनाचा प्रसार होण्याचीही भीती कमी आहे. आम्ही केवळ अशाप्रकारच्या तयार पायाभूत सुविधांचा वापर करू इच्छितो, असा आग्रह बापट यांनी धरला.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी या प्रस्तावाच्या व्यवहार्यतेविषयी शंका उपस्थित केली आहे. “लवासा हे ठिकाण फार दूर असून काही अडचणीदेखील आहेत. विविध बाबींचा विचार केल्यानंतरच अशा सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आगे. गिरीश बापट यांनी काही सूचना केल्या आहेत. जेव्हा गरज असेल त्यावेळी आम्ही याबाबत निर्णय घेऊ,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून पुण्यात कलगीतुरा, बापटांनी अजित पवारांवर केली शेलक्या शब्दात टीका

धान्याला कीड लागू नये म्हणून ‘सेव्ह ग्रेन ‘बॅग ची निर्मिती !

श्रावणात तरी मंदिरं खुली करा, शिवसेना नेते चांद्रकांत खैरेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!