Share

औरंगाबादेत ‘मास्क’ न वापरणाऱ्यांनी भरला ’70’ लाखांचा दंड

Published On: 

औरंगाबाद : देशात कोरोनाचा जरी मंदावला असला तरी, कोरोना धोका पुर्ण पणे टळलेला नाही. त्यामुळे कोरोना संबंधी शासनाने लागू केलेले नियम आपण पाळणे गरजेचे आहे. असे असतांना मात्र, औरंगाबादमध्ये नियमांचे दुर्लक्ष होतांना पाहायला मिळत आहे. कोरोनाला हरवण्यासाठी मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर बंधनकारक असतांना, मात्र शहरात अनेक जण विना मास्क फिरत आहे. महापालिकेने 8 महिन्यात 14 हजार 96 नागरिकांकडून तब्बल 70 लाख 48 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

1 मे पासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शहरात फिरतांना मास्क बंधनकारक केल्यानंतर अनेक जण रस्त्यावर विनामास्क आढळले होते. त्यापार्श्वभुमीवर पालिकेने मास्क न लावणाऱ्यावर 500 रुपये दंड लावण्यास सुरुवात केली होती. नागरिक मित्र पथकामार्फत शहरातील रस्त्यांवर, चौकात, सिंग्नलवर विनामास्क फिरणाऱ्यांकडून पालिकेने 70 लाख 48 हजार रुपयांचे दंड वसुल केले आहे.

जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी, मास्क न वापरणाऱ्यांकडून 500 रुपये दंड वसुल करण्यात येईल, व त्यांना त्याबद्दल मास्क देण्यात येईल अशी घोषणा केली होती. मात्र, शहरात नागरिकांकडून दंड वसुल केला असला तरी, दंड भरणाऱ्य़ा नागरिकांना मास्क मिळालेले नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!