Share

आणखी एका राज्यातील काँग्रेस सरकार कोसळलं; नारायणसामी सरकारला बहुमत सिद्ध करण्यात अपयश

Published On: 

नवी दिल्ली: पुदुचेरी विधानसभेचा कार्यकाळ २१ जून २०२१ रोजी संपणार आहे. पण कार्यकाळ संपण्यासाठी जेमतेम चार महिने उरले असताना पुदुचेरीत अस्थिरता निर्माण झाली. मुख्यमंत्री नारायणसामी बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरले आणि काँग्रेसचे सरकार पडले. नारायणसामी यांनी पदाचा राजीनामा दिला.

बहुमत ठराव सादर करण्यासाठी एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं.यात नारायणसामी सरकारचा पराभव झाला.विधानसभेत बहुमत सिद्द न झाल्याने काँग्रेसचे मुख्यमंत्री नारायणसामी यांनी आपला राजीनामा नायब राज्यपालांकडे पाठवला आणि आता ते पायउतार झाले आहेत.

अधिवेशन सुरु होताच नारायणसामी यांनी बहुमतासाठी प्रस्ताव मांडला होता. पण काही वेळातच त्यांच्यासहित सत्ताधारी आमदारांनी सभात्याग केला. यानंतर अध्यक्षांनी काँग्रेस सरकार अल्पमतात असल्याचे जाहीर केले.

दरम्यान,  यानंतर मुख्यमंत्री नारायणसामी यांना आपला राग अनावर झाला. बहुमत ठराव मांडण्याआधी नारायणसामी यांनी, ‘पुद्दुचेरीत जे काही सुरु आहे तो राजकीय वेश्याव्यवसाय असल्याची टीका केली आहे .

दरम्यान,पुदुचेरीत काँग्रेसचे सरकार कोसळले असले तरी एप्रिल-मे महिन्यात याठिकाणी पुन्हा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, या निवडणुकांमध्ये पुन्हा सत्तेत येणे काँग्रेससाठी अवघड बाब मानली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!