पुणे : गेल्या २४ तासात पुण्यात १८८२ नवीन करोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता पुण्यात करोनाबाधीतांची संख्या ३१ हजार ८८४ वर जाऊन पोहोचली आहे. काल दिवसभरात पुण्यात १७ करोनाबाधीतांचा मृत्यू झाला असून पुण्यात आज अखेरपर्यंत ९०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या २४ तासात ७६४ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. आजवर एकूण २० हजार ३३४ रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.
राज्यात काल ५५२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६३ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ५८ हजार १४० झाली आहे. दरम्यान, काल कोरोनाच्या ८६४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख १४ हजार ६४८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १४ लाख ४६ हजार ३८६ नमुन्यांपैकी २ लाख ८४ हजार २८१ नमुने पॉझिटिव्ह (१९.६५टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख १० हजार ३९४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४२ हजार ८३३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २६६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.९४ टक्के एवढा आहे.
महत्वाच्या बातम्या-
एक परीक्षा आपले भविष्य ठरवत नाही, बारावीच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन
सातारा जिल्ह्यात कडकडीत बंद, प्रवाशांचे हाल
…म्हणून तडकाफडकी ‘डॉक्टर डॉन’ मालिकेचा सेट दुस-या ठिकाणी हलवला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

