अलिबाग: अलिबाग येथील कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या बोडणी गावात आज तपासणी करण्यास गेलेल्या पथकात व ग्रामस्थांमध्ये संघर्ष झाला. या पथकांना ग्रामस्थांनी थेट हाकल्याचे देखील समोर येत आहे. तर अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी केलेली विनंती देखील धुडकावत असहकार्य केले. तर, या ग्रामस्थांची समजूत काढण्यासाठी गेलेल्या तहसीलदार व पोलीस अधिकाऱ्यांना थेट या ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
दरम्यान, या बोडणी गावात गेल्या ४ दिवसात ७२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात प्रशासनाने आरोग्य तपासणी मोहीम हाती घेतली आहे. मात्र ग्रामस्थांकडून आरोग्य तपासणी करून घेण्यास नकार दिला जात आहे. उलट तपासणीसाठी गावात येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्यास ग्रामस्थांनी सुरवात केली. त्यामुळे अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ, मांडवा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके, गटविकास अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी ग्रामस्थांची समजूत काढण्यासाठी तिथे गेले.
तुमच्या शुभेच्छांनी अधिक समर्पित होऊन काम करण्याचे बळ मिळाले – अजित पवार
मात्र, खोटे रिपोर्ट देऊन ग्रामस्थांना करोनाबाधित ठरवले जात असल्याचा दावा या ग्रामस्थांनी केला. तसेच, आरोग्य तपासणी करून घेण्यास नकार दिला. यासंदर्भात लोकसत्ताने वृत्त दिले आहे. गावातील शेकडो नागरीक यावेळी रस्त्यावर उतरले होते. यात करोनाबाधित रुग्णांचाही समावेश होता. त्यामुळे इथली परिस्थिती गंभीर होती. तर सोशल डिस्टनसिंगचे देखील तीन-तेरा झाल्याचे इथे पाहायला मिळाले.
प्लाझ्मा थेरपीबाबत जनतेनी सावध राहावं, गृहमंत्र्यांचं आवाहन
हे सर्वजण अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत होते. तहसीलदार, पोलीस अधिकारी आणि काही पत्रकारांनाही या बोडणीकरांच्या रोषाला सामोरे जावे लागले. अखेर ग्रामस्थांच्या या आडमुठेपणापुढे हतबल झालेल्या प्रशासकीय यंत्रणांनी गावातून काढता पाय घेतला. दरम्यान गृह विलगीकरणात असलेले करोनाबाधित गावात फिरत असल्याने करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे आता प्रशासनाने या गावकऱ्यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. नाहीतर मोठ्या प्रमाणात गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
लॉकडाउनच्या काळात केसांच्या सौंदर्यासाठी घरगुती उपाय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

