टीम महाराष्ट्र देशा : जांभई येणे ही अशी सामान्य बाब आहे. हे आपल्याला माहित असते. भूक लागली म्हणजे जांभई येते. तसेच झोप लागली म्हणजे जांभई येते. परंतु या व्यतिरिक्त सुद्धा अनेक वेळा जांभई येते. पण जांभई येण्यामागचे कारण फार कमी लोकांना माहित आहे.
जांभई येण्याचे कारण शरीरात ऑक्सिजन फार कमी असणे. तर मेंदूला तशा सूचना दिल्या जातात. आणि आपोआप जांभई येते. मग चारचौघांत किंवा मीटिंगमध्ये तुम्हांला जांभई येते. अशा वेळेस त्यावर कशी मात करायची हे जाणून घेऊ या.
सतत जांभई येत असल्यास विनोदी व्हिडिओ पाहावा. कारण हसणे हे जांभई येऊन न देण्याचे प्रभावी उपाय आहे. आईस टी किंवा आईस कॉफी देखील जांभईचे प्रमाण कमी करते. याच प्रमाणे शरीराचे तापमान कमी झाल्यास जांभई कमी येते अशा एका संशोधकांचा दावा आहे. त्यामुळे थंडगार पेय प्या.
याचप्रमाणे चारचौघांत सतत जांभई देण्याची सवयी आटोक्यात ठेवा. दिर्ग श्वास घ्या. शरीरात ऑक्सिजन कमी असेल तर जांभई येण्याच प्रमाण वाढते. त्यांमुळे तुम्हांला सतत जांभई येत असेल तर दिर्ग श्वास घ्या. नाकातून श्वास आत घ्या आणि तोंडाद्वारे श्वास बाहेर टाका. यामुळे शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते.
महत्वाच्या बातम्या
मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा सरकारचा अजेंडा : मुख्यमंत्री
ईव्हीएमचा अर्थ एव्हरी वोट फॉर मोदी : मुख्यमंत्री


