Share

नाशिकमधील शाळा सुरु करण्याबाबत छगन भुजबळांचा महत्वाचा निर्णय!

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. यानंतर राज्यभरात शाळा सुरु करण्यासाठी लगबग सुरु झाली होती. राज्य सरकारकडून कडक नियमावली जाहीर करण्यात आली होती.

मात्र, दिवाळीनंतर पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढताना दिसत असून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तसेच, येत्या दोन महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपेंसह स्थानिक प्रशासनाने अधिक काळजी घ्यावी असं आवाहन केलं आहे. त्यामुळे वाढत्या धोक्यात शाळा सुरु होणार का असा प्रश्न पुन्हा निर्माण झाल्याने संभ्रम वाढत आहे.

मुंबईमध्ये ३१ डिसेंबरनंतर, पुण्यात १३ डिसेंबरनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन तर पिंपरी-चिंचवडमध्ये ३० नोव्हेंबरनंतरच शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे तेथील प्रशासनाने स्पष्ट केल्यानंतर उर्वरित महाराष्ट्राबाबत शाळा सुरु करण्याचा निर्णय हा स्थानिक प्रशासनाने घ्यावा असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले होते.

शाळा सुरु करण्यासाठी २३ नोव्हेंबर म्हणजेच उद्याची तारीख राज्य सरकारने जाहीर केली होती. अशातच आता नाशिकमधील शाळांबाबत देखील राज्याचे मंत्री व नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातील शाळा उघडण्याचा निर्णय पुढे ढकलला तर योग्य ठरेल असे पोलीस, आरोग्य खात्याचं म्हणणं आहे. त्यामुळे 4 जानेवारीला शाळा सुरू करणार असल्याची माहिती नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!