🕒 1 min read
पुणे : पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये कालपासून(९ ऑगस्ट) निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. दोन्ही शहरांमध्ये आजपासून सोमवार ते शुक्रवार सर्व सेवा, दुकाने, व्यापार हे रात्री ८ वाजेपर्यंत तर शनिवार-रविवार दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. यासोबतच, हॉटेल्स सर्व दिवशी रात्री १० पर्यंत सुरु राहतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी केली.
दरम्यान, काल कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्यानंतर आज निर्बंध शिथिलतेच्या दुसऱ्या दिवशी मात्र नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामुळे निर्बंधांमधून शिथिलता मिळाली असली तरी कोरोनामुक्त करण्यासाठी पुणेकरांनी काटेकोरपणे नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
आज २२६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, २५४ रुग्णांची कोरोनावर मात केली असून ७ रुग्णांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. सध्या शहरात २ हजार ५१ सक्रिय रुग्ण आहेत. यातील २०३ रुग्णांची प्रकृती ही गंभीर तर ३२९ रुग्ण हे ऑक्सिजनच्या साहाय्याने उपचार घेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सगळं ठाकरे सरकारच झिंगलंय कारण कुटुंब वसुलीत रंगलय’
- ‘MPSC आयोगामध्ये ठराविक एका जातीच्याच लोकांची नियुक्ती’; प्रीतम मुंडे लोकसभेत कडाडल्या
- ठरलं ! 17 ऑगस्टपासून राज्यातील ‘या’ इयत्तेचे वर्ग भरणार
- नांदेड विभागातून तीनशेवी किसान रेल्वे सुसाट; महसूलात कोटींनी वाढ!
- बालाजी तांबे यांच्या निधनाने आयुर्वेद क्षेत्राची मोठी हानी – डॉ. नीलम गोऱ्हे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
