🕒 1 min read
मुंबई : मागील दिड वर्षापासून जगभरात कोरोनाच्या संसर्गामुळे सर्व जनजीवन ठप्प झाले होते. यादरम्यान जवळपास सर्व क्रिडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. कालांतराने कोरोनाच्या नियमाचे पालन करत क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येऊ लागले. मात्र सामन्याच्या वेळी मैदानात प्रेक्षकांना परवानगी नाकारण्यात आली.
प्रेक्षक नसल्याने खेळाडूंनाही थोडं चुकल्या सारखं वाटतंय. भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्मा देखील भरगच्च भरलेल्या स्टेडियमची वाट पाहत आहे. त्याने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर करत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
या फोटो मध्ये तो शतक ठोकल्यानंतर हेल्मेट आणि बॅट उंचावून प्रेक्षकांना अभिवादन करताना दिसून येत आहे. या फोटोमध्ये त्याने सगळा फोकस हा प्रेक्षकांवरती ठेवला आहे. त्या फोटोपेक्षा रोहितने दिलेल्या कॅप्शनने रोहितने सर्वांचे मन जिंकले आहे.
????.????.????.????.????.????.????, this is the reunion I am waiting for! pic.twitter.com/nGBhDA6yM4
— Rohit Sharma (@ImRo45) May 27, 2021
रोहित कॅप्शनमध्ये म्हणतो, ‘फ्रेंड्स या रियूनियनचा मी वाट पाहतो आहे’. म्हणजेच प्रेक्षकांनी भरलेलं स्टेडिअम, गर्दी, आवाज, आपल्या खेळाडूंसाठीचं केलेलं चिअरअप….या सगळ्या गोष्टी रोहित मिस करतोय, त्याचीच आठवण रोहितने शेअर केलेल्या फोटोमधून करून दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- श्रीलंकेविरुद्ध कामगीरीनंतर बांग्लादेशच्या खेळाडूंची आयसीसी क्रमवारीत मोठी झेप
- पुणे पोलिसांच्या मदतीला आला एक खास रक्षक; जॉन अब्राहमनेही केले कौतुक
- मायावतींवर केलेल्या अश्लिल विनोदामुळे अभिनेता रणदीप हुड्डा अडचणीत
- गिरीश कुबेर यांच्या अडचणीत वाढ ; पुण्यामध्ये भाजपकडून पोलिसात तक्रार दाखल
- ‘व्हॉट्सअॅप वापरणा-यांची प्रायव्हसी धोक्यात आणू देणार नाही; मोदी सरकारच्या अटी अमान्य’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
