Share

राहुल गांधी यांच्याविषयी बोलण्यास यापुढे तोंड उघडले तर… याद राखा! कॉंग्रेसचा दानवेंना इशारा

Published On: 

औरंगाबाद : राहुल गांधी यांच्याविषयी यापुढे तोंड उघडले तर, जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक होऊन चांगलाच धडा शिकवतील.  आमदार कैलास गोरंट्याल यांनी दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध करत धडा शिकवण्याचा इशारा त्यांना दिला. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी खासदार राहुल गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे दानवे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे शनिवारी सकाळी गांधी पुतळा चौकात दहन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर जालना जिल्हा व शहर काँग्रेसतर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली.

राहुल गांधी देवाला सोडलेल्या वळूप्रमाणे असून ते कोणत्याच कामाचे नाहीत, असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले होते. डाॅ. भागवत कराड यांची जनआशीर्वाद यात्रा शुक्रवारी बदनापूर येथे आली तेव्हा दानवे बोलत होते. ‘देवाला सोडलेला वळू जसा कोणत्याच कामाला चालत नाही तसेच राहुल यांचे आहे. ते कोणत्याच कामाचे नाहीत. पंतप्रधान म्हणून मोदी जनतेच्या कल्याणासाठी अहोरात्र झटत आहेत, तर राहुल गांधी या पदासाठी निष्क्रिय आहेत, असे मंत्री दानवे या वेळी म्हणाले होते.

राहुल गांधी यांच्याबद्दल केलेल्या या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. शनिवारी सकाळी प्रा. सत्संग मुंडे, जाफराबाद तालुका अध्यक्ष सुरेश गवळी यांनी दानवे यांच्या पुतळ्याचे दहन केले. आमदार कैलास गोरंट्याल यांनी दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध केला. काँग्रेस समितीचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख यांनी दानवेंना भान ठेवून बोलण्याचा सल्ला दिला. शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महमूद यांनी दानवे यांनी माफी मागावी नसता काँग्रेस कार्यकर्ते अनेक ठिकाणी त्यांना घेराव घालतील असा इशारा दिला.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!