Share

‘हिंमत असेल तर अफगाणिस्तानात जाऊन तालिबानवर टीका करा’, भाजपचे जावेद अख्तर यांना आव्हान

Published On: 

मुंबई : प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. तालिबान विषयी आपले मत व्यक्त करताना जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दल या संघटनांवर देखील टीका केली आहे. तालिबान हे जंगली असून त्यांचे कृत्य निंदनीय आहे. भारतात आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे जे समर्थन करतात ते सुद्धा तालिबान सारखेच आहेत असं म्हटलं आहे.

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी जावेद अख्तर यांच्यावर टीका करत त्यांनी आपले विधान मागे घ्यावे असे म्हटले आहे. ‘आरएसएस आणि विश्व हिंदू परिषद सुद्धा तालिबानी मानसिकतेचे आहेत हे जावेद अख्तर यांचं विधान म्हणजे केवळ बेशरमपणाचा कळस नसून समस्त हिंदू समाजाचा अपमान आहे. जावेद अख्तर हे विसरत आहेत की, या हिंदू समाज बहुसंख्य असलेल्या देशात राहून ते तालिबानवर टीका करत आहेत. हिंमत असेल तर अफगाणिस्तानमध्ये जा आणि तालिबानवर टीका करा. त्यामुळे जावेद अख्तर आपलं विधान मागे घ्या. हिंदू समाजाची क्षमा मागा नाहीतर तुमच्या विरोधामध्ये बदनामीचा खटला केला जाईल’ असे भातखळकर यांनी म्हटले आहे.

जावेद अख्तर काय म्हणाले होते?
ज्या पद्धतीने तालिबानी हे मुस्लिम राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्या पद्धतीने आपल्याकडे काहीजण हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडतात. हे लोकही त्याच मानसिकतेचे आहेत. तालिबानी हिंसंक आहेत, रानटी आहेत पण आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांचे समर्थन करणारे लोकही त्याच मानसिकतेचे आहेत. भारतातील मुस्लिमांचा एक छोटासा गट तालिबानचे समर्थन करतोय असंही जावेद अख्तर यांनी सांगितलं.

भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी याच मुद्द्यावरून जावेद अख्तर यांच्यावर टीका केली आहे. भारताची सत्ता संघ स्वयंसेवकांच्या हाती असतानाही तालिबानी डीएनए असलेले जावेद अख्तर सारखे देशद्रोही आमच्या देशात सुरक्षित पणे राहतात आणि वाट्टेल तसे विषारी फुत्कार सोडतात यातूनच संघाचे धोरण आणि विचारधारा लक्षात येते पण भेदवृत्ती असलेल्या या समाजकंटकांना कसे कळणार ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!