Share

Uddhav Thackeray : “हिमंत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावावर मतं मागा”, उद्धव ठाकरेंचे बंडखोर आमदारांना आव्हान

Published On: 

मुंबई: आज (२५ जून) शिवसेना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरु आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) खासदार संजय राऊत यांचीही उपस्थिती आहे. यावेळी शिवसेनेने पाच महत्वाचे ठराव मंजूर केले असून त्यापैकी बाळसाहेब ठाकरे नाव दुसऱ्यांना वापरता येणार नाही असा महत्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला आहे.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना चांगलेच सुनावले आहे. “हिमंत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावावर निवडणूक लढवा”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. तसेच शिवसैनिकांना आज शिवसेना भवनावर जमण्याचे आवाहनही करण्यात आल्याचे कळते आहे. दरम्यान सेना भवनाबाहेर शिवसैनिकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आहे.

शिवसेनेचे पाच ठराव-

बंडखोरांना त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा, मी मध्ये पडणार नाही. असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. या बैठकीत पाच ठराव मंजूर झाले आहेत. त्यापैकी पहिला ठराव म्हणजे सर्व अधिकार हे पक्ष प्रमुखांकडे असतील. म्हणजेच उद्धव ठाकरेंकडे असतील. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची होती, आहे आणि राहणार त्यामुळे बंडखोर आमदारांनी त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा. तिसरा ठराव म्हणजे शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे पक्षप्रमुखांना अधिकार असतील. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव अन्य कुणाला वापरता येणार नाही. सेनेची मराठी अस्मितेशी आणि हिंदुत्वाशी बांधिलकी कायम राहील. असे पाच ठराव या बैठकीत मंजूर झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!