🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलो आहे. माझ्यावर वैयक्तिक टीका होत असून या टीकेला मी शांतपणे घेत आहे. ज्याला दाखवायचं त्याला मी त्याच वेळेला करून दाखवतो. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. यावर आता भाजप नेते आ. अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.
याबाबत आ. अतुल भातखळकर ट्विट करत म्हणाले, ‘ज्याला दाखवायचं आहे त्याला मी त्याच वेळी करुन दाखवतो’ म्हणजे टीकाकारांचे टक्कल करणे, डोळा फोडणे, खटला भरणे हेच ना? झेपत असेल तर थोडं काम करून दाखवा. असा टोला अतुल भातखळकरांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शाखाप्रमुख, विभागप्रमुख, नगरसेवक, आमदार, खासदार यांच्यासोबत बैठक पार पडली. उद्धव ठाकरे यांनी यावेळी विरोधकांच्या टीकेवर भाष्य केले आहे, ‘मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलो आहे. माझ्यावर होणाऱ्या टीकेला मी शांतपणे घेत आहे. ज्याला दाखवायचं आहे त्याला मी त्याच वेळी करुन दाखवतो. मी माझ्या कामानेच माझी पोचपावती देतो. तुम्ही निवडणुकीसाठी तयारीला लागा,’ असे उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
- अनाथांची माय अनाथ करून गेली…! सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन
- सिंधूताई जेव्हा मुख्यमंत्र्यांना प्रोत्साहन देतात, “केवढी आव्हानं रे तुझ्यासमोर लेकरा..”
- आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती- मुख्यमंत्री ठाकरे
- बाळ धनंजय… म्हणून माझ्या कार्याची पोहोच पावती देणाऱ्या माईंच्या निधनाने व्यथित झालो-धनंजय मुंडे
- “मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलो आहे, ज्याला दाखवायचं त्याला…”, विरोधकांना उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
