पुणे : पुणे जिल्हा परिषद आणि भारतीय जैन संघटनेतर्फे कोविडमुक्त गाव अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात पुणे जिल्ह्यातही नुकतीच करण्यात आली. ऑनलाईन उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. महिलांनी आणि युवकांनी निश्चय केल्यास गाव कोविडमुक्त होऊ शकेल, असा विश्वास यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केला.
ग्रामविकास विभागाच्या वतीनं कोविडमुक्त गाव करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 'बिजेएस'च्या सहकार्यानं पुण्यातील काही गावात राबवलेला हा उपक्रम यशस्वी ठरल्यानं तो राज्यस्तरावर राबवण्याबाबत मंत्रिमंडळातील इतर सदस्यांना कार्यक्रमाची माहिती देण्यात येईल.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 22, 2022
याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार ट्विट करत म्हणाले, पुणे जिल्हा परिषद आणि भारतीय जैन संघटनेतर्फे राबवण्यात येणाऱ्या कोविडमुक्त गाव अभियानाच्या जिल्हास्तरीय उद्धाटन कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहिलो. कोविडच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यानिमित्तानं सरपंचांशी संवाद साधला.
ग्रामविकास विभागाच्या वतीनं कोविडमुक्त गाव करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ‘बिजेएस’च्या सहकार्यानं पुण्यातील काही गावात राबवलेला हा उपक्रम यशस्वी ठरल्यानं तो राज्यस्तरावर राबवण्याबाबत मंत्रिमंडळातील इतर सदस्यांना कार्यक्रमाची माहिती देण्यात येईल.
कोणताही उपक्रम वैयक्तिक प्रयत्नानं यशस्वी होत नाही, त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असते. ग्रामीण भारताची सूत्र युवकांच्या हाती जात असून त्यात महिलांची संख्याही लक्षणीय आहे. महिलांनी आणि युवकांनी निश्चय केल्यास गाव कोविडमुक्त होऊ शकेल, असा विश्वास मला आहे.
महत्वाच्या बातम्या
- अजित पवारांची मोठी घोषणा; नाशिक विभागाला ३४६ कोटींचा वाढीव निधी मंजूर
- …त्यामुळे प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेश झाला नाही- प्रियंका गांधी
- “गोव्यातील भाजपमध्ये फुटताय बंडाळीचे फटाके”, संजय राऊतांचे टीकास्त्र
- अभिमानास्पद! जम्मू काश्मीरातील मच्छल खोऱ्यात छत्रपती शिवरायांची मूर्तीस्थापना
- “काँग्रेसच्या आत्मविश्वासाचा फुगा गोव्यात इतका फुगला की त्यांना सत्यदर्शनाचे वावडे झाले”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

