उस्मानाबाद : अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्याची गरज आहे. अटी-शर्ती घालून विमा कंपनी जर शेतकऱ्यांना विमा नाकारत असेल, तर त्या कंपनीला जिल्ह्यातून हद्दपार करु अशा इशाराच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी दिला. कळंब तालुक्यातील दहिफळ येथील शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. तसेच शेतात जाऊन सोयाबीन पिकाची पाहणी केली.
लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून आपण शासनाकडे मागणी केली आहेच. पण विमा कंपनीने सुध्दा आता शेतकऱ्यांचा अंत बघू नये. दरवर्षी प्रीमियम भरून घ्यायचा मात्र निरनिराळ्या अटी शर्ती लाऊन, झालेल नुकसान नाकारायच व विम्याची मदत नाकारायची. हेच जणू दरवर्षी विमा कंपनीचा धोरण बनलेल आहे. यावर्षी मात्र प्रचंड नुकसान झाले असून, सरसकट नुकसान मान्य करून. शेतकऱ्यांना कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
याहीवर्षी जर अटी शर्ती लाऊन कंपनी नुकसान भरपाई नाकारणार असेल. तर मग मात्र विमा कंपनीवर बहिष्कार घालून कंपनीला जिल्ह्यातून हद्दपार करू. अशी रोखठोक भूमिका संजय दुधगावकर यांनी पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले असता मांडली. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- अजितदादांना आता साखर कडू वाटायला लागलीय का?; किरीट सोमय्यांचा तिखट सवाल
- कोरोनाळे बंद असलेली धार्मिक स्थळं पुन्हा झाली खुली; राज्यभरातील भाविकांमध्ये उत्साह
- देवेंद्र फडणवीस तब्बल ८ लाख भाजपा कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधणार
- अभिनेता रणबीरच्या ‘या’ चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये वाढलीय उत्सुकता
- ‘या’ जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला; तब्बल 61 गावांत कडक टाळेबंदी लागू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

