औरंगाबाद : उद्योजकाला मारहाण झाल्याची घटना औद्योगिक परिसरात घडली होती. या प्रकारामुळे उद्योग संघटना नाराज आहेत. अशा घटना वारंवार घडत असल्याची तक्रार इथल्या उद्योजकांनी केली आहे. त्यामुळे अशा हिंसाचाराच्या घटना घडत असतील तर नव्याने गुंतवणूक करण्यासाठी आलेला उद्योजक आधी दहा वेळा विचार करतो, असे मत ज्येष्ठ उद्योजक राम भोगले यांनी व्यक्त केले.
औरंगाबादच्या औद्योगिक नगरीमध्ये एका कामगाराने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यासाठी कंपनी मालकाला काही गुंड प्रवृत्तीच्या नागरिकांनी मारहाण केली. या विरोधात उद्योग जगतातून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. उद्योजक सुरक्षित नसतील तर अशा औद्योगिक क्षेत्रामध्ये नवीन गुंतवणूक कशी होईल? असा प्रश्न या निमित्त उपस्थित केला जात आहे.
राज्याचे उद्योग मंत्रीच सध्या औरंगाबादचे पालकमंत्री आहेत. या संदर्भात आपण त्यांची भेट घेणार असल्याचे भोगले यांनी स्पष्ट केले. हिंसाचाराच्या घटनेला कोणताच राजकीय पक्ष पाठिशी घालणार नाही, असेही ते माध्यमांशी बोलताना म्हणाले. पालकमंत्र्यांच्या आगामी दौऱ्यात पालकमंत्री या बाबत कठोर आदेश देतील, असा विश्वाास त्यांनी व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बाटल्यांपेक्षा राज्याच्या हिताचा थोडा तरी विचार करा’ भाजपची टीका
- देशभरात गेल्या तीन वर्षात एकूण 5,17,322 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी
- भाजपमध्ये साईडलाईन झालेले विखे, हर्षवर्धन पाटील यांनी ‘या’ कारणासाठी घेतली अमित शाहांची भेट
- भाजप आमदाराच्या मतदारसंघात शिवसेनेची रणनीती; दिग्गजांचा शिवसेनेत प्रवेश!
- चित्रपटगृह, नाट्यगृह सुरु होणार ? ; ठाकरे सरकारची मंत्रिमंडळ बैठक सुरु
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
