🕒 1 min read
मुंबई – राज्यातील अनेक लोकं पवारसाहेबांना भेटत असतात. त्यांच्या काही समस्या मांडत असतात. ‘त्या’ समस्या राज्याच्या प्रमुखाच्या कानावर घालून काही निर्णय घ्यायचा असेल म्हणून पवारसाहेबांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असेल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.
पवारसाहेब मुख्यमंत्र्यांना आज पहिल्यांदाच भेटत नाहीत. पवारसाहेब ५० वर्ष समाजकारण, राजकारण करत असताना त्यांच्या अवतीभवती देशाचं आणि राज्याचं राजकारण फिरत असतं. राज्याच्या प्रश्नाकरीता चारवेळा मुख्यमंत्रीपद सांभाळले आहे. महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यावरही पवारसाहेब मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत असेही अजित पवार यांनी सांगितले.
या बैठकीला मला, जयंतराव पाटील, बाळासाहेब थोरात यांना बोलावण्यात आले नाही याचा अर्थ ही राजकीय चर्चा नसावी. पक्षीय चर्चा असती तर कदाचित आम्हाला बोलावलं असतं असंही अजित पवार यांनी स्पष्ट केले.दरम्यान, या भेटीत नेमक्या कोणत्या विषावर चर्चा झाली याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही मात्र, राज्यपाल नियुक्त 12 विधानपरिषद सदस्यांचा प्रश्न या मुद्द्यासह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याची शक्यता आहे.
याशिवाय राज्यातील पूर परिस्थिती, कोरोना आढावा, ओबीसी राजकीय आरक्षण, राज्यात महाविकास आघाडीतील नेत्यांवर ईडीचे धाडसत्र आणि महाविकास आघाडीतले समन्वयाचे मुद्दे अशा विषयांवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कंगनाला दिलासा नाहीचं! जावेद अख्तर प्रकरणात होणार कारवाई
- भाजपसोबत ‘डील’ केल्यानेच परमवीरसिंग NIA चे आरोपी नाहीत – राष्ट्रवादी
- एकनाथ खडसेंनी जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचं स्पष्ट दिसतंय- ईडी
- ‘माझ्या बहिणीच्या पाठीशी मी सदैव आहेच!’, धनंजय मुंडेंचे सूचक वक्तव्य
- ‘नीलम गोऱ्हे राज्यात महिलांवर तालिबानी अत्याचार होत असताना आता कोठे आहेत ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
