मुंबई : गेले पाच महिने राज्यभरात कोरोनाने हाहाकार घातला आहे. पुण्यातील जनजीवन एकबाजूला सुरळीत होत असतानाच कोरोनाच्या थैमानाचे व प्रशासनाचे व्यवस्थेचे वाभाडे निघालेले दिसून येत आहेत. अनेक जिल्ह्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेड्स उपलब्ध नाहीत.
आरोग्य व्यवस्थेच्या गलथान कारभारामुळे अनेकांचे जीव जात असून २ दिवसांपूर्वी पत्रकार पांडुरंग रायकर व पुण्याचे माजी महापौर दत्ता एकबोटे यांचा देखील प्रशासनाच्या समन्वयाअभावी बळी गेला. त्यामुळे नागरिकांच्या मनात संतापाची भावना असून राज्यभरात सर्व व्यवस्था असल्याचे दावे करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या दाव्यांवर प्रश्न उभे केले गेले.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाने मात्र या दुर्दैवाचे खापर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर फोडले आहे. तर, फडणवीस सरकारच्या काळात शिवसेना देखील प्रमुख पक्ष म्हणून सामील होती, याचा सामनाला विसर पडल्याचे दिसून येत आहे.
सामना अग्रलेखात काय म्हटले आहे?
मागच्या पाच वर्षांत फडणवीस सरकारने आरोग्यविषयक काम केले असते तर, आज ज्या तात्पुरत्या सुविधा ‘जम्बो’ म्हणून उभाराव्या लागल्या ते प्रमाण कमी झाले असते. विरोधी पक्षांच्या टीकेचा, आरोपांचा मुख्य भर हा जम्बो कोविड केंद्रांवरच आहे. ही केंद्रे धडपणे चालू द्यायची नाहीत, त्यात काम करणाऱ्या डॉक्टर, नर्स यांच्यावर दबाव आणून दहशत निर्माण करायची असे राजकीय धोरण राज्याच्या गंभीर स्थितीस धोकादायक आहे. पुण्यातील राजकारण्यांनी याचे भान ठेवले तर पांडुरंग रायकर, दत्ता एकबोटे यांना जे भोगावे लागले ते इतरांच्या नशिबी येणार नाही.
महत्वाच्या बातम्या -:
आता कंगना म्हणते…मुंबईनं मला यशोदामाई सारखं सांभाळलं! जय मुंबई, जय महाराष्ट्र
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले देखील कोरोनाग्रस्त! पावसाळी अधिवेशनाचे काय होणार?
कंगना तर फक्त बेबी पेंग्विनला वाचवायचं कारण आहे ; नितेश राणेंचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

