Share

दिल्ली सरकारने भ्रष्टाचार केलाय तर आपले केंद्रातले सरकार कारवाई का करत नाही? अण्णांनी ‘ते’ निमंत्रण नाकारले

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- भाजपचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी अण्णा हजारे यांना पत्र लिहून दिल्लीतील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी भाजपच्या आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र ह्या आंदोलनात अण्णा हजारे यांनी सहभागी होण्याचे निमंत्रण नाकारले आहे. उलट ‘दिल्ली सरकारने भ्रष्टाचार केला असेल तर आपले केंद्रातील सरकार त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई का करीत नाही? ‘असा सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भाजपला केला आहे.

भाजपचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी अण्णा हजारे यांना पाठवलेले पत्र प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाल्यानंतर हजारे यांनी त्यांना उत्तर पाठविले आहे. या पत्रात हजारे यांनी म्हटले आहे की, ‘तुमचे पत्र वाचून मला वाईट वाटले. तुमचा पक्ष मागील सहा वर्षाहून अधिक काळ देशात सत्तेत आहे. सर्व यंत्रणा तुमच्या ताब्यात आहे. मंदिरात राहणाऱ्या ८३ वर्षीय अण्णा हजारे ज्यांच्याकडे, पैसा नाही, संपत्ती नाही, सत्ता नाही अशा माणसाला दिल्लीत आंदोलन करण्यासाठी बोलावत आहे, यापेक्षा दुर्दैवी आणखी काय असू शकते.

मराठा समाजाला आरक्षण देणं चुकीचं : गुणरत्न सदावर्ते

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच असा दावा करतात की केंद्र सरकारने भ्रष्टाचार निर्मूलनासाठी कठोर पावले उचलली आहेत. जर अशीच परिस्थिती असेल आणि दिल्ली सरकारने भ्रष्टाचार केला असेल तर आपले सरकार त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई का करीत नाही? की भ्रष्टाचार निर्मूलनाचे केंद्र सरकारचे सर्व दावे निरर्थक आहेत? असा प्रश्नच हजारे यांनी उपस्थित केला आहेत.

ई-पास रद्द करण्याबाबत मनसे आक्रमक

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!