टीम महाराष्ट्र देशा – केंद्र सरकाने सामान्य जनतेतला आक्रोश लक्षात घेऊन CAA म्हणजेच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत फेरविचार करावा, जर लोकांना असुरक्षित वाटत असेल तर हा कायदा रद्द करावा, असं विधान महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे .
गेल्या १२ डिसेंबर रोजी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यापासून विविध विद्यार्थी आणि पुरोगामी संघटना रस्त्यावर उतरून या कायद्याचा विरोध करत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी भारतीय जनता पक्ष ह्या कायद्याचं समर्थन करत असून , कायदा मागे घेण्याचा प्रश्नचा नाही असं गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली प्रचार सभेत ठणकावून सांगितल्याने हा संघर्ष अजून पुढे चालणार असल्याचे स्पष्ट झाले .
तसेच येत्या काळात भाजप तीन कोटी घरांशी संपर्क साधून कायद्याबद्दल माहिती देणार असून सामान्य जनतेचे गैसमज दूर करणार असल्याचही भाजप कडून सांगण्यात आलं आहे.
याचबाबतीत राज्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता त्यांनी सामान्य जनतेचा आक्रोश आणि विरोध लक्षात घेता फेरविचार करावा . तसेच हा कायदा नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करत असेल तर हा कायदा रद्द करावा असेही मत पटोले यांनी व्यक्त केले .
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

