🕒 1 min read
मुंबई : भारत-चीन सीमारेषा भागात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून चीनच्या 59 अॅप्स वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यात टिक टॉक, शेअर इट, हॅलो, यूसी ब्राऊझर यासारख्या अनेक अॅप्लिकेशनचा समावेश आहे. नुकतंच याबाबतचं पत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
‘राज्य सरकारनेच पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले; कॉंग्रेस ‘बेगडी’ आंदोलन करत आहे’
डेटा आणि गोपनीयता समस्यांमुळे भारत सरकारने हे पाऊल उचललं असल्याचे बोललं जात आहे. दरम्यान भारतात टिक-टॉक लाखो चाहते आहेत. या चाहत्यांना मात्र यामुळे झटका बसला आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम 69 A च्या अंतर्गत ही बंदी घातली आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सांगत 59 चिनी मोबाईल अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये टिकटॉक, यूसी ब्राउझर आणि हॅलो अॅप यासारख्या लोकप्रिय अॅप्सचा समावेश आहे.
भारत सरकारच्या या निर्णयावर शिवसेना नेते आणी खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया देत भाजपवर आसूड ओढले आहेत. ‘चिनी अॅप्सपासून धोका आहे हे आपल्याला आधी माहिती होते तर या कंपन्या का सुरु होत्या? आमच्या वीस जवानांचे बलिदान झाले नसते तर या कंपन्या अशाच सुरु राहिल्या असत्या’, अशी टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली आहे.
‘चिनी अॅप्सवरील बंदीचं मी तुर्तास स्वागत करतो. पण तुमची गोडीगुलाबी झाल्यावर हा धोका नाही गुलाबजाम होता असं होवू नये’, असा टोला संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लगावला. ‘चीनचे आर्थिक कंबरडे मोडावे ही सगळ्यांची भूमिका आहे. चीनच्या गुंतवणूतीबाबतही आर्थिक धोरण ठरवले पाहिजे. अन्यथा पाकिस्तानसोबत जसे संबध जोपासले जातात तसंच होवू नये’, असंदेखील संजय राऊत म्हणाले.
पंढरपूरमध्ये महापूजेला मुख्यमंत्र्यांसह दत्ता भरणेंना प्रवेश द्या, अजित पवारांच्या सक्त सूचना
तर याच बंदीचा धागा पकडून कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी NaMo अॅप बंद करण्याची मागणी केली आहे. ‘१३० कोटी भारतीयांची खाजगी माहिती धोक्यात आहे म्हणून सरकारने ५९ मोबाईल अॅपवर बंदी घातली. याच निकषावर वापरकर्त्यांची माहिती गोळा करणारे, परस्पर खाजगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्यांचा डेटा भारताबाहेर परदेशातील कंपन्यांना पाठवणारे NaMo अॅप देखील बंद केले पाहिजे’. अस पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.
१३० कोटी भारतीयांची खाजगी माहिती धोक्यात आहे म्हणून सरकारने ५९ मोबाईल अॅपवर बंदी घातली. याच निकषावर वापरकर्त्यांची माहिती गोळा करणारे, परस्पर खाजगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्यांचा डेटा भारताबाहेर परदेशातील कंपन्यांना पाठवणारे NaMo अॅप देखील बंद केले पाहिजे. #BanNaMoApp
— Prithviraj Chavan (@prithvrj) June 30, 2020
दरम्यान, आत टिक टॉकने खुलास करत निवेदन जारी केलं असून आम्ही चिनी सरकारला भारतीयांची माहिती दिलेली नाही असं म्हटलं आहे. भारत सरकारने एकंदर ५९ अॅप्स ब्लॉक करण्यासंदर्भात अंतरिम आदेश जारी केला असून यात टिकटॉकचाही समावेश आहे. आम्ही या आदेशाचे पालन करत आहोत. आम्हाला याबाबत सरकारच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठकीचे निमंत्रण आले असून या बैठकीत आम्हाला आमची बाजू मांडण्याची व स्पष्टीकरण देण्याची संधी मिळणार आहे. डेटा प्रायव्हसी व डेटा सिक्युरिटीबाबतच्या सर्व भारतीय अधिनियमांचे टिकटॉक काटेकोरपणे पालन करत असून आमच्या भारतातील वापरकर्त्यांची कोणतीही माहिती आम्ही कोणत्याही परदेशी सरकारला दिलेली नाही, चिनी सरकारलाही नाही. भविष्यात आमच्याकडे अशी मागणी करण्यात आली, तरीही आम्ही अशी माहिती कोणत्याही परिस्थितीत देणार नाही. आमच्या दृष्टीने वापरकर्त्यांची गोपनीयता व अखंडता याला अनन्यसाधारण महत्त्व आहे,” असं टिकटॉक इंडियाचे प्रमुख निखिल गांधी यांनी म्हटलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
