Share

पंढरपूरमध्ये महापूजेला मुख्यमंत्र्यांसह दत्ता भरणेंना प्रवेश द्या, अजित पवारांच्या सक्त सूचना

Published On: 

पुणे : आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये विठूरायाची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडणार आहे. मुख्यमंत्री, कुटुंबीय, मानाचा वारकरी आणि ठराविक पुजारी यांच्या उपस्थितीत शासकीय पूजा पार पाडणार आहे. तर ठाकरे सरकारमधील मंत्री दत्ता भरणे यावेळी उपस्थित असतील.

माउलींच्या पादुका आज पंढरपूरकडे मार्गस्थ होणार, जाणून घ्या नेमके कसे आहे संपूर्ण नियोजन

विठूरायाची महापूजा करण्यासाठी मंत्र्यांना अनेक जणांचे फोन येत आहेत. मात्र अशा परिस्थितीत या शासकीय पूजेसाठी केवळ पालकमंत्री या नात्याने दत्ता भरणे हेच उपस्थित राहणार आहेत. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला तशा सक्त सूचना दिल्या आहेत.

मंदिर परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे दत्ता भरणे वगळता इतर कोणालाच मंदिरात परवानगी देऊ नये, असं बजावण्यात आलं आहे. पालकमंत्री असल्याने त्यांना परवानगी द्यावी, अशी सूचना उपमुख्यमंत्र्यांनी केली.

दरम्यान, आषाढी एकादशीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पादुका उद्या दुपारचा नैवेद्य झाल्यानंतर विशेष गाडीतून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार असून संध्याकाळी ०७.०० पर्यंत त्या पंढरपुरात पोचतील अशा पद्धतीनं नियोजन करण्यात आल्याची माहिती आळंदी देवस्थान समितीचे विश्वस्त अभय टिळक यांनी दिली.

1 जुलै रोजी दोन्ही पालख्यांचे चंद्रभागा स्नान, नगर प्रदक्षिणा, मुख, कळस दर्शन होणार असून त्यानंतर त्या मठात मुक्कामी जातील. 2 तारखेला पालख्यांची पादुका भेट आणि नैवैद्य अर्पण कार्यक्रम होऊन रात्री पालख्या परत येतील. दरम्यान, आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

आनंदाची बातमी ! भारतात कोरोनाची पहिली लस तयार, मानवी चाचणीला दिली परवानगी

दरम्यान, आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मंगळवारी सायंकाळपर्यंत पंढरपुरात दाखल होत आहेत. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर आजारी पडल्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरही होम व्कारंटाइन झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील यात्रा नियोजनाची जबाबदारी पुणे विभागीय अतिरिक्त आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्यावर सोपवण्यात आली आहे. डॉ. भोसले पंढरपुरात दाखल झाले असून त्यांनी सर्व सुत्रे हाती घेतली आहेत.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!