Share

‘असेच चालू राहिले तर ‘ते’ गांधींना काढून सावरकरांना राष्ट्रपिता बनवतील’असदुद्दीन ओवेसींचा टोला

Published On: 

नवी दिल्ली: स्वातंत्र्यवीर सावरकर कठोरपणे बोलले म्हणून जनतेचा गैरसमज झाला. पण जर संपूर्ण भारत त्यांच्यासारखे बोलला असता तर देशाला फाळणीला सामोरे जावे लागले नसते.असे वक्तव्य मोहन भागवत यांनी केले आहे. ते ‘वीर सावरकर: द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन’ या उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी बोलत होते. आता यावरूनच एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी मोहन भागवत यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

ते विकृत इतिहास मांडत आहेत. हे असेच चालू राहिले तर ते महात्मा गांधींना काढून टाकतील आणि सावरकरांना राष्ट्रपिता बनवतील, ज्यांच्यावर महात्मा गांधींच्या हत्येचा आरोप होता आणि जस्टिस जीवन लाल कपूर यांच्या चौकशीत त्यांना दोषी ठरवण्यात आले. असा विकृत इतिहास मोहन भागवत मांडत आहेत. असा टोला एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी लगावला आहे.

दरम्यान वीर सावरकर मुस्लिमांचे शत्रू नव्हते त्यांनी तर उर्दूमध्ये गझल लिहिली होती. स्वातंत्र्यापासून वीर सावरकरांविषयी लोकांमध्ये माहितीचा अभाव आहे. पण आता लोक या पुस्तकाद्वारे वीर सावरकरांना ओळखू शकतील. त्यानंतर स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती आणि योगी अरविंद आहेत. त्यांच्याबद्दल योग्य माहितीही लोकांना उपलब्ध करून दिली जाईल. असेही मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!