महाराष्ट्र देशा टीम : आजकाल प्रदुषणाचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असल्याचं दिसून येत आहे. आपल्याला माहित असेल की, वातावरणात थोडा जरी बदल झाला तरी साथीचे आजार लगेच पसरतात. यामध्ये बदलत्या वातावरणाचा लहान मुलांवर लगेचच असर झालेला दिसतो. यामध्ये सर्दी, खोकला या आजारांचा समावेश असतो. जर तुमच्या घरातील लहान मुलाला बदलत्या वातावणामुळे सर्दी, खोकला झाला असेल, तर लगेचंच डाॅक्टरकडे धाव घेऊ नका. त्याआधी तुम्ही काही घरगुती उपाय करूनही तो आजार दूर करू शकता. तुम्हाला जर घरगुती उपाय माहित नसतील, तर काळजी करू नका. कारण आज आम्ही तुम्हाला यावरील काही उपाय सांगणार आहोत.
1. हळदीचे दूध –
हळदीचे दूध शरीरासाठी खूप फायदेशीर असते. हळदीचे दूध मुलांना दिल्यास सर्दी-खोकलापासून आराम मिळतो. तसेच ते मुलांच्या शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. हळदीच्या दुधामुळे मुलांच्या शरीरात उष्णता निर्माण होते. कच्च्या हळदीचा वापर हळदीचे दूध बनवण्यासाठीही करता येतो. परंतू ते दूध तुम्ही लहान मुलाला देत असाल, तर लक्षात ठेवा की त्यामध्ये हळदीचे प्रमाण कमी ठेवणे आवश्यक आहे.
2. वाफ –
वाफेमुळे मुलांमध्ये खोकला आणि सर्दी बरे होण्यास मदत होते. बंद नाक आणि घशालाही वाफेमुळे आराम मिळतो. त्यामुळे दिवसातून एकदा तरी मुलांना वाफ द्या. त्याचबरोबर वाफेमुळे छातीत साचलेला कफ दूर होण्यासही मदत होते. मात्र मुलांना वाफ देताना काळजी घ्या.
3. मध आणि तुळस –
लहान मुलांसाठी मध आणि तुळशी खूप फायदेशीर आहेत. याच्या सेवनाने सर्दी-खोकला बरा होण्यासोबतच शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. मुलांना मध आणि तुळशीचा अर्क देण्यासाठी तुळशीच्या दोन ते तीन पानांचा रस काढा. आता तुळशीचा अर्क एका चमच्यात घ्या आणि त्यामध्ये मधाचे काही थेंब टाका . आता ही पेस्ट मुलांना द्या. मध आणि तुळस दिल्याने मुलांना लगेचंच आराम मिळेल.
4. काढा –
दालचिनी, लवंग, आले आणि तुळस यांचा वापर मुलासाठी काढा बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. या सर्व गोष्टी थंडीत मुलाला आराम देण्यास मदत करतात. एका भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये दालचिनी, लवंग, आले आणि तुळस टाका. त्यानंतर भांड्यातील पाणी थोड कमी झालं की गॅस बंद करा. परंतू मुलांना हा काढा फक्त एक ते दोन चमचे द्या.
टीप : वरील गोष्टी करताना डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला घ्या.
महत्वाच्या बातम्या :
- MS Dhoni | धोनीचे हे मोठे रेकार्ड या T20 विश्वचषकातही मोडणं कठीण आहे; नेमकं काय आहे ते रेकॉर्ड
- Chandrashekhar Bawankule | “नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांवर बोलणं हे सूर्यासमोर दिवा दाखविण्यासारखं आहे”
- IND VS SA । नाकातून रक्त येत होते पण रोहितने मैदान सोडले नाही; नेमकं काय घडलं?
- Nilam Gorhe | “भाजपने ‘या’ तिघांना रोजगार दिला”; नीलम गोऱ्हे यांची सडकून टीका
- Narayan Rane | उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जाणार का ?, नारायण राणे म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

