नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ICMRने डिस्चार्ज देण्या संदर्भात नवीन नियमावली काढली आहे. यानुसार डिस्चार्ज दिल्यास कोरोनाबाधित रुग्णांची सांख्य घटताना दिसत आहे. देशात एका बाजूला कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असतानाचं काही रुग्ण बरे होऊन घरी देखील जात आहेत. त्यामुळे आता ICMRने डिस्चार्ज देण्या संदर्भात नवीन नियमावली काढली आहे.
नवीन नियमावली नुसार, उपचारानंतर सौम्य किंवा मध्यम स्वरुपाची लक्षणं दिसल्यानंतर 3 दिवस ताप नसेल, तर 10 दिवसांतच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येईल. सौम्य लक्षणं आढळल्यानंतर कोरोना टेस्ट न करताच त्यांना डिस्चार्ज मिळेल. गंभीर रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांची डिस्चार्जच्याआधी टेस्ट करण्यात येईल. गंभीर रुग्णांचा ताप 3 दिवसात उतरला आणि पुढचे 4 दिवस शरिरात ऑक्सिजनची मात्रा 95 टक्के राहिल्यास 10 दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात येईल.
जे रुग्ण गंभीर आहेत आणि व्हेंटिलेटरवर आहेत, त्यांची लक्षणं दूर झाल्यानंतरच त्यांना डिस्चार्ज मिळेल. डिस्चार्जनंतर या रुग्णांना आता घरी 14 ऐवजी 7 दिवसच आयसोलेशनमध्ये राहावं लागेल. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णालयातील खाटा आणि कोरोना टेस्ट किटची उपलब्धता लक्षात घेता अभ्यास करुन हा निर्णय घेतल्याचं आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं आहे.
दरम्यान रविवारी देशात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 1,668 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. महाराष्ट्रातही रविवारी 399 रुग्णांना घरी सोडण्यात आलं. सोमवारी दुपारी 4 वाजेपर्यंत देशभरात 1,559 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
येत्या शैक्षणिक वर्षांपासून पहिली ते सहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीने शिकवली जाणार
एवढी आहे उद्धव ठाकरेंची संपत्ती, वाचाल तर व्हाल थक्क !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

