मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पहिल्यांदाच मुख्यमंत्री ठाकरेंची संपत्ती किती आहे, हे उघड झाले. उद्धव ठाकरे यांनी आपल्याकडे 143 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं जाहीर केलं.
संपत्तीचे विवरण टाकताना उद्धव ठाकरेंनी लिहिले की, स्वत:कडे एकही वाहन नाही, दोन घरं आहेत, एक फार्महाऊस आहे, तसंच विविध कंपन्यांच्या शेअर्समधून येणारा डिव्हिडंट हे उत्पन्नाचे स्त्रोत आहे. उद्योग व्यवसायाच्या कॉलममध्ये उद्धव ठाकरेंनी नोकरी म्हटलं आहे. तर पत्नी रश्मी ठाकरेंच्या नावासमोर उद्योग/व्यवसाय आहे.
उत्पन्नाचे स्त्रोत उद्धव ठाकरेंनी वेतन, व्याज, बोनस, लाभांश (डिव्हिडंट), भांडवली नफा, असे दाखवले आहे. उद्धव ठाकरेंची संपत्ती – 76 कोटी 59 लाख 57 हजार 577 तर रश्मी ठाकरेंची संपत्ती – 65 कोटी 09 लाख 02 हजार 791 दाखवली आहे. उद्धव ठाकरे हे संपत्ती जाहीर करणारे दुसरे ठाकरे ठरले आहेत. त्याआधी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी संपत्ती जाहीर केली होती.
दरम्यान राज्यपालांच्या शिफारशीनंतर राज्यात आता विधान परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत. याच निवडणुकीच्या रिंगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उतरले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसाठी महत्त्वाची असलेली विधान परिषदेची निवडणूक आता बिनविरोध होणार आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपला उमेदवारी अर्ज विधान भवनात दाखल केला.
यावेळी उद्धव ठाकरेंसह सहकुटुंब उपस्थित होते. पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा तेजस ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीचे नेतेही उपस्थित होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार, कॉंग्रस नेते अशोक चव्हाण, आदि नेते उपस्थित होते. तर आघाडीच्या इतर उमेदवारांनीही मुख्यमंत्र्यांंसोबत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. येत्या 21 तारखेला विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
लॉकडाऊन कसा हाताळाल ? पंतप्रधान मोदींनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्या टिप्स
लॉकडाऊन वाढणार पंतप्रधान मोदींनी दिले संकेत, राज्यांना ब्लू प्रिंट देण्याचे निर्देश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

