Share

माढ्याचा तिढा …म्हणून मलाच उमेदवारी मिळाली पाहिजे : प्रभाकर देशमुख

Published On: 

🕒 1 min read

पंढरपूर : शरद पवार यांनी नेतृत्व केलेला मतदारसंघ म्हणून माढा लोकसभा मतदारसंघांची ओळख आहे. मोदी लाटेतसुध्दा या मतदारसंघांने राष्ट्रवादीला साथ दिली होती. त्यामुळे या मतदारसंघांच्या उमेदवारीसाठी चांगलीच रस्सीखेच आहे. माढा लोकसभा निवडणुकीसाठी विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील,सेवानिवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख हे इच्छुक आहेत. पण, आता माजी आमदार दिपकराव साळुंखे यांनीही उमेदवारीची तयारी चालविल्याने तिढा निर्माण झाला आहे.

दरम्यान,माढा लोकसभा मतदारसंघात शिक्षण, रोजगार आणि पाणी यासारखे महत्वाचे प्रश्न प्रलंबीत आहेत. ते प्रश्न मी लोकसभेत गेल्यानंतर सहज सोडवू शकतो, असा दावा करत माझा खासदार विजयसिंह मोहिते पाटीलांच्या उमेदवारीला विरोध नसल्याचे माढा लोकसभेसाठी इच्छुक, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी आज येथे सांगितले.

मी माढ्यातून लोकसभेसाठी उमेदवारी द्यावी अशी मागणी खासदार शरद पवारांकडे केली आहे.माझा कोणाच्या उमेदवारीला अजिबात विरोध नाही किंवा त्यांच्या कामाबद्दल आक्षेपही नाही. तरीही मतदार संघातील पाणी, रोजगार आणि शिक्षणासारखे मुलभूत प्रश्न प्रलंबीत आहेत. या प्रश्नांवरती आणखी काम करावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासकीय सेवेतील अनुभावाचा फायदा लोकांच्या सेवेसाठी करायचा आहे म्हणूनच, मी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

माढा हा राष्ट्रवादीसाठी सुरक्षित मतदारसंघ आहे. माण, फलटण, सांगोला, माळशिरस, करमाळा, माढा या विधानसभा मतदारसंघांत समावेश होतो. २००९ साली शरद पवार यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. २०१४ साली मोदी लाटेत अटीतटीच्या लढतीत येथून विजयसिंह मोहिते-पाटील विजयी झाले होते. देशमुख यांच्यामागे मोहिते–पाटील यांच्या विरोधकांची खेळी आहे का, यादृष्टीनेही पाहिले जात आहे.

सहकारमहर्षी शंकरराव मोहिते – पाटील यांची जन्मशताब्दी शासनाच्या वतीने साजरी केली जात असून यानिमित्ताने पाटील यांची भाजपशी जवळीक वाढली असल्याचे काहींनी पवारांच्या कानावर घातले आहे. माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी द्यावी, असा एक मतप्रवाह पक्षात आहे.

माढ्याचा तिढा : प्रभाकर देशमुख शर्यतीत, विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या डोकेदुखीत वाढ 

मोहिते-पाटलांचा होणार पत्ता कट?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!