मुंबई : सत्तापालट झाल्यानंतरचं पहिलंच अधिवेशन हे वादळी ठरणार असल्याचे संकेत पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळालं होतं. 50 खोके एकदम ओके, ईडी सरकार हाय हायच्या घोषणा देत विरोधकांनी राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष केलं. यानंतर आता राष्ट्रवादीचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांना पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे.
सरकारचं स्पष्टीकरणः
यानंतर सरकारने वारंवार हे सरकार गोरगरिबांसाठी काम करत असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार असल्याचं त्यांनी अनेक वेळा लोकांना म्हटलं आहे. यावरूनच राष्ट्रवादीचे सरचिटणीस अमोल रामकृष्ण मिटकरी यांनी ट्विटर द्वारे विरोधकांवर निशाणा साधला.
अमोल मिटकरी यांचं ट्विटः
सत्ताधाऱ्यांना वारंवार सांगावं लागत आहे की हे सरकार गोरगरिबांसाठी काम करत आहे. तसेच हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे याच कारण 50 खोके एकदम ओके हे चांगलंच झोंबलेलं दिसतंय, असा टोला अमोल मिटकरी यांनी ट्विटरद्वारे लगावला आहे.
50 खोके एकदम ओकेः
दरम्यान, 50 बंडखोर आमदारांमुळे सत्ता स्थापन होण्यास मदत झाली. त्यामुळे पावसाळी अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी 50 खोके एकदम ओकेचा नारा लावला.


