Share

‘मी तर त्यांच्या कानफडात लगावल्या असत्या’ इंग्लंडमधील ‘त्या’ प्रकरणावर रणतुंगा बरसले

Published On: 

मुंबई : गेल्या काही दिवसापासुन श्रीलंका क्रिकेट संघ या ना त्या कारणाने नेहमीच वादात सापडत आहे. गेल्या काही काळापासुन श्रीलंका संघाची कामगीरी अतिशय सुमार झाली होती. यात इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या खेळाडूंनी बायोबबलच्या नियमाचा भंग केल्यामुळे क्रिकेट बोर्डाची प्रतिमा अधीकच मलीन झाली होती.

याच प्रकरणावर श्रीलंकेते माजी क्रिकेटपटु आणि विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार अर्जुन रणतुंगा चांगलेच भडकले आहे. ‘श्रीलंका संघाच्या खेळाडूंना क्रिकेट सोडून इतर सर्वकाही करण्यात जास्त रस आहे. क्रिकेट बोर्ड यावर काहीच कारवाई करत नाही. मला जर शक्य झाले असते तर मी त्याना सोशल मीडीयापासुन दुर ठेवले असते. जर माझ्या संघातील खेळाडूंनी अशाप्रकारचे कृत्य केले असते तर मी त्यांच्या ३-४ कानफडात लगावल्या असत्या.’ असे रणतुंगा म्हणाले.

बांग्लादेश दौऱ्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर श्रीलंकेच्या अपयशाची मालिका सुरुच आहे. टी-२० मालिकेत सपशेल शरणागतीनंतर एकदिवसीय मालिकेतही अपयशाची कामगीरी सुरुच आहे. यादरम्यान श्रीलंकेचे कुशल मेंडीस, निरोशन डिकवेला आणि धनुष्का गुणतिलका या खेळांडुनी बायोबबलच्या नियमाचा भंग करत सिगारेट पिण्यासाठी बाहेर रस्त्यवर फिरेल होते. हे प्रकरण उघड झाल्यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या तिनही खेळाडूंना निलंबीत केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!