मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने राज्यात मोठ्या कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आता ईडीने आपला मोर्चा बॉलिवूडकडेही वळवल्याचं दिसत आहे. ईडीने बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतमला समन्स बजावली. त्यानंतर आता मनी लॉड्रिंग प्रकरणी ईडीनं अभिनेता दिनो मोरियाची संपत्ती सील करण्यात आली. स्टर्लिंग बायोटेक बँकेच्या फसवणूकीचा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे.
दिनो मोरियासह अभिनेता संजय खान आणि डिजे अकील यांची कोट्यवधींची संपत्ती सील केली आहे.14 हजार 500 कोटी रुपयांचे बँक घोटाळ्यातील आरोपी आणि गुजरातचे बिजनेसमन संदेसरा बंधु यांच्यासोबत या तिघांचं कनेक्शन असल्याचं ईडीच्या तपासातून समोर आले आहे.
https://www.instagram.com/p/CQaPJ9ynZ-G/?utm_medium=copy_link
जप्त केलेल्या संपत्तीपैकी तीन कोटी रुपयांची मालमत्ता संजय खान यांची असून, डिनो मोरियाची संपत्ती 1.4 कोटी रुपये आहे आणि डिजे अकील नावाने लोकप्रिय असलेल्या अकील अब्दुलखलील बचूअलीची संपत्ती 1.98 कोटी रुपये आहे. तर अहमद पटेल यांचे जावई इरफान अहमद सिद्दिकी यांची संपत्ती 2.41 कोटी रुपयांची आहे.
Enforcement Directorate (ED) has provisionally attached movable & immovable properties worth Rs. 8.79 Crore under PMLA in Sandesara Group case. With this attachment, the total attachment reached to Rs 14,521.80 Crore: ED pic.twitter.com/tBylEB1rPI
— ANI (@ANI) July 2, 2021
कालच ईडीने ‘फेमा’ कायद्या अंतर्गत यामीला समन्स बजावलं असल्याचं समजले होते. ‘फेमा’ कायद्याचं उल्लंघन केल्या प्रकरणी यामी गौतमला जबाब नोंदवावा लागणार आहे. त्यासाठीच ईडीने पुढील आठवड्यात जबाब नोंदवण्यासाठी हजर राहावं यासाठी यामीला समन्स बजावली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : ‘या’ जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाऊन; अत्यावश्यक सेवा राहणार सुरु !
- पैठणच्या एकनाथ महाराज पालखी दिंडी सोहळ्याचे औपचारिक प्रस्थान, पादुका १८ दिवस नाथमंदिरात मुक्कामी
- स्वच्छता प्रिमियर लीगचे थेट लाईव्ह प्रक्षेपण खास औरंगाबादकरांसाठी! ८० कर्मचाऱ्यांचा सत्कार
- ‘अमित शाह यांच्या मुलाची संपत्ती देखील भरमसाठ वाढलीये’; ईडी कारवाईवरून नाना पटोलेंचा टोला
- जो समाज मागासलेलाच नाही त्यांना आरक्षण मिळूच शकत नाही – गुणरत्न सदावर्ते
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

