Share

मी शेतकऱ्यांसोबत उभा; रितेश देशमुख उतरला मैदानात!

Published On: 

मुंबई:- केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरुद्ध दिल्लीच्या सीमेवर गेल्या १० दिवसांपासून हजारो शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच आहे. यात देशभरातील जवळपास ४० शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत. अनेकजण यावर आपला अभिप्रायही देताना दिसत आहेत. एकीकडे संपूर्ण पंजाब सिनेसृष्टी शेतकरी आंदोलनाला पुढे येऊन पाठिंबा देत आहे. आता बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटी या आंदोलनावर आपली भूमिका मांडताना दिसत आहेत. रितेश देशमुखनेही शेतकऱ्यांचं समर्थन करणार ट्वीट यावेळी केलं आहे.

रितेश देशमुख अनेकदा देशातील महत्त्वपूर्ण प्रश्नांवर आपलं मत मांडताना दिसतो. शनिवारी रितेश देशमुखने ट्वीट करत म्हटलं की, ‘जर तुम्ही आज जेवत असाल तर त्याबद्दल शेतकर्‍याचे आभार माना. मी आपल्या देशातील प्रत्येक शेतकऱ्यांसोबत एकजुटने उभा आहे.’ दरम्यान, बॉलिवूड आणि पंजाब सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. सोनू सूद, गुरदास मान, गिप्पी ग्रेवाल, हनी सिंग, कपिल शर्मा, स्वरा भास्कर, वीर दास, तापसी पन्नू यांच्यासह अनेक स्टार सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलताना दिसत आहेत.

दरम्यान, माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी कायद्यांविरुद्ध शड्डू ठोकला आहे. शरद पवार हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. ९ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता ही भेट होणार असल्याची माहिती मिळतेय. यावेळी पवार यांच्यासोबत अन्य राजकीय पक्षांचे काही नेते उपस्थित असणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!