🕒 1 min read
माझ्यासाठी सर्व धर्म समान आहेत. मी मोहम्मद रफी यांना वडील मानलं आहे. माझा ड्रायव्हर मुस्लीम आहे. जे लोक मला मुस्लीमविरोधी बोलत आहे, तर तो माझा नाही त्यांचा प्रॉब्लेम आहे”. अजानबद्दलच्या ट्वीटनंतर सोनू निगमला एका मौलानाने टक्कल करुन फिरवण्याची धमकी दिली होती. त्यानंतर सोनू निगम स्वत: आपल्या डोक्यावरचे केस कापून माध्यमांसमोर हजर झाला.
“मी मुस्लीमविरोधी नाही. मी केवळ अजानबाबतच नाहीतर मंदिरं, गुरुद्वारांच्या लाऊडस्पीकरबद्दलही बोललो. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माफ करा,” असं गायक सोनू निगमने सांगितले.
“लाऊडस्पीकर ही धार्मिक गरज नाही. माझ्यामते, लाऊडस्पीकर गुंडगिरी आहे. धर्माच्या नावावर लोक दारु पिऊन नाचतात ही गुंडगिरीच आहे. मी स्वत:ला धर्मनिरपेक्ष समजतो. माझी चूक असेल तर मला माफ करा. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. मला माझं मत मत मांडण्याचा अधिकार आहे तसा तुम्हालाही आहेच. मंदिरात आरती गरजेची आहे, लाऊडस्पीकर नाही. मी पहिला देशाचा नागरिक आहे, त्यानंतर कलाकार आहे असे तो म्हणाला.
Jiss insaan ne poori zindagi Mohd Rafi sahab ko apna pita maana hai, jiske guru ka naam Ustad Gulam Mustafa Khan sahab hai: Sonu Nigam (1/2) pic.twitter.com/9f6aFHQr1N
— ANI (@ANI) April 19, 2017
If he(Maulvi) has 10 lakh rupees then he should give it to me, I will donate it to some charity: Aalim Hakim(who shaved Nigam's head) pic.twitter.com/qaqN9TzWSb
— ANI (@ANI) April 19, 2017
Sonu Nigam gets his head shaved after a Fatwa was issued announcing 10 Lakhs for anyone who shaves Nigam's head pic.twitter.com/wWUZmnmb8N
— ANI (@ANI) April 19, 2017
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
