🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा :राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज (ता. १६ ) नागपूरमध्ये सुरवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप नेत्यांनी केसरी रंगाच्या ‘मी सावरकर’ नामक टोप्या घालून निषेध केला.
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी केलेल्या सावरकरांविरोधातील विधानावरुन हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपा नेत्यांनी घोषणाबाजी कारण आंदोलन केले. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी भाजपाला त्याच स्टाईल मध्ये उत्तर दिले आहे. हातात एक फलक घेऊन त्यांनी एकट्याने वेगळ्या पद्धतीने आंदोलन केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावरून राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपा आमदारांनी केली. यावेळी ‘मी पण सावरकर’ असे लिहिलेल्या टोप्या घालून विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी करण्यात आली.मात्र भाजपाला उत्तर देण्यासाठी आमदार प्रकाश गजभिये यांनी हातात एक छोटा फलक घेतला होता. त्यावर “म. गांधींचा खून मी केला. मी नथुराम गोडसे बोलतोय. या देशात माझेच विचार चालतील”. असे लिहिले होते.त्यांचा एकट्याने हातात फलक घेऊन आंदोलन करतानाचा फोटो व्हायरल झाला.
महत्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1206569824878354432?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1206565996154089473?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
