🕒 1 min read
सांगली: राज्याचे जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी एक खुलासा केला आहे. ब्लड प्रेशर आणि डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता म्हणून मी गृहमंत्री पद नाकारले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यावेळी अजित पावर यांनी याबाबत खुलासा केला होता. त्याची कबुली जयंत पाटलांनी दिली आहे. अजित दादांनी मी गृहमंत्री पद न घेण्याबाबत जे काही सांगितले ते खरंच आहे, याची कबुली जयंत पाटील यांनी दिली आहे. सांगली जिल्हा पोलीस दलाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जयंत पाटील यांनी आर.आर. आबा यांच्या समवेतील एक किस्साही सांगितला. 2009 साली आर. आर. पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्यानं गृहमंत्रीपद तुम्हाला सांभाळायचंय, असं मला पक्षाकडून सांगण्यात आलं होतं. त्यावेळी एका लग्नात गृहखातं कसं असतंय? हे आर. आर. पाटलांना विचारलं. त्यावेळी आबांनी मला ब्लड प्रेशर आहे का? डायबिटीस आहे का? याची विचारणा केली. मी नाही म्हटल्यावर आर. आर. पाटलांनी मग तुम्ही गृहमंत्री व्हा, हे दोन्ही त्रास तुम्हाला सुरु होतील, असे मिश्कीलपणे म्हटल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या उत्पादनाला परवानगी द्या, शेतकरी श्रीमंत होईल- सदाभाऊ खोत
- ‘रवी राणांनी जे केलंय ते चिल्लरगिरी, स्वतःला शेतकऱ्यांचं कैवारी समजतात आणि पदोपदी नौटंकी’
- त्यांची जीभ घसरली होती आता पाय घसरला जाऊ नये; नवाब मलिकांचे चंद्रकांत पाटलांना खडेबोल
- सर्वात आधी महाविकास आघाडी स्थापन करणाऱ्या हिंगोलीतच ‘आघाडीत बिघाडी’?
- कश्मिरा शाह, सुनिता आहुजा यांच्यात पुन्हा वाद..?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
