Share

‘करून दाखवलं’ नवाब मलिकांच्या घरात साचल पाणी

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : मुंबईत सुरु असणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवा आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यासोबतच नेतेमंडळींनाही बसला आहे. जवळपास ४८ तासांहून अधिक काळ सुरु असणाऱ्या पावसामुळे मुंबईची लाईफलाईन एकिकडे ठप्प झाली तर, दुसरीकडे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस नेते, प्रवक्ते नवाब मलिक यांच्या घरात पाणी साचल असल्याने त्यांना देखील हा त्रास सहन करावा लागला आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून मलिक यांनी त्यांच्या घरात पाणी साचल्याचे काही फोटो पोस्ट केले. माझं घर…. असं लिहित त्यांनी घरातील काही फोटो पोस्ट केले. या पोस्टमध्ये त्यांच्या घरात गुडघ्यांपर्यंत पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. मलिक यांनी ‘करुन दाखवलं’ असं लिहित या पोस्टच्या माध्यमातून शिवसेनेला टोला लगावला आहे. ज्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं आहे.

दरम्यान, ‘निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांना मतं मिळाली, पण सर्वसामान्यांचे प्रश्न मात्र अद्यापही दुर्लक्षितच आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्यांचे जीव धोक्यात असताना सत्ताधऱ्यांना मात्र काहीच फरक पडत नाही’, असा संताप नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!